'पुण्यश्लोक अहिल्याबाई'चा भव्य दिव्य सेट, १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृतीमधून घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 06:51 PM2021-01-02T18:51:28+5:302021-01-02T18:52:09+5:30

पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका ४ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Magnificent divine set of 'Punyashlok Ahilyabai', inspired by 15th-18th century Marathi-Malwa culture | 'पुण्यश्लोक अहिल्याबाई'चा भव्य दिव्य सेट, १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृतीमधून घेतली प्रेरणा

'पुण्यश्लोक अहिल्याबाई'चा भव्य दिव्य सेट, १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृतीमधून घेतली प्रेरणा

googlenewsNext

ऐतिहासिक मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळ्या असतात. पडद्यावरचे दृश्य खरेखुरे वाटावे यासाठी अत्यंत नेमकेपणाने दृक् सौंदर्य साकारावे लागते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील आगामी भव्य ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई नववर्षाची प्रेरणादायक सुरुवात करत ४ जानेवारीपासून भेटीला येत आहे. या मालिकेत अहिल्याबाई होळकर यांची जीवनगाथा मांडली आहे. या मालिकेसाठी योग्य दृक् सौंदर्य साकारण्यासठी निर्मात्यांनी तब्बल सहा महीने व्यापक संशोधन केले आणि पुढील सहा महीने अगदी सुरुवातीपासून सेट तयार करण्यात खर्ची केले. 

सेट उभारण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलताना कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर म्हणाले, “हा सेट तयार करताना आमची प्रेरणा होती, १५-१८व्या शतकातील मराठी-माळवा संस्कृती. मी यापूर्वी काही पौराणिक मालिकांसाठी काम केलेले आहे पण ही माझी पहिलीच ऐतिहासिक मालिका आहे आणि मी म्हणेन की, हा अगदीच वेगळा अनुभव आहे. पौराणिक मालिकांमध्ये कलात्मक स्वातंत्र्य घेता येते, पण इथे मात्र जास्तत जास्त अचूक आणि नेमके असण्यावर आमचा भर असतो. कारण त्याची सहज तुलना केली जाते. सेट डिझाइन अस्सल दिसण्यासाठी आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पार्श्वभूमीसाठी पडदे आणि महालतील इतर फर्निचरसाठी अस्सल आणि उच्च दर्जाचे महेश्वरी वस्त्र वापरले आहे.”


 या मालिकेतील सेट डिझाइनबद्दल पुढे बोलताना दिग्दर्शक जॅक्सन सेठी म्हणाले, “सेट डिझाइन हा केवळ कालसूचक म्हणून नाही, तर मालिकेतील मुख्य संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई साठी सेट उभारताना तो अगदी अस्सल आणि राजेशाही असावा याबाबत आमचा कटाक्ष होता. त्यामुळे आमच्या या मालिकेसाठी साजेसा सेट उभारायला आम्हाला बराच जास्त वेळ लागला. आम्ही प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन जाऊ इच्छितो, जेथे ते अहिल्याबाई होळकरांचा जीवनप्रवास आणि त्याचे वैभव अनुभवू शकतील.”


 पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका ४ जानेवारी पासून प्रेक्षकांना दर सोमवार ते शुक्रवार रात्री ७.३० वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पहायला मिळेल.

Web Title: Magnificent divine set of 'Punyashlok Ahilyabai', inspired by 15th-18th century Marathi-Malwa culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.