इंद्रनील सेनगुप्ताची छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार जादू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:16 IST2017-10-24T09:46:13+5:302017-10-24T15:16:13+5:30
मूळ कोलकात्याचा रहिवासी असलेला आणि हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता सध्या ‘निम्की मुखिया’ या ...
इंद्रनील सेनगुप्ताची छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार जादू
म ळ कोलकात्याचा रहिवासी असलेला आणि हिंदी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता सध्या ‘निम्की मुखिया’ या मालिकेत अभिमन्यू राय या गटविकास अधिका-याची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत भूमिका साकारण्यास मिळाल्यामुळे तो सध्या खुशीत आहे. अभिमन्यू राय या प्रेमळ,व्यवहारी सरकारी अधिका-याची भूमिका तो साकारत आहे.गेल्या काही दिवसांपासून इंद्रनीलचा एक पाय मुंबईत,तर दुसरा कोलकात्यात आहे,याला कारणही तसे खास आहे.सध्या तो एका बंगाली चित्रपटाचही शूटिंगमध्ये बिझी आहे.त्यामुळे सध्या तो मालिका आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींचे शूटिंग करत असल्यामुळे ‘निम्की मुखिया’च्या चित्रीकरणासाठी त्याला मुंबईत राहावे लागते आणि त्याच्या बंगाली चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याला कोलकात्यात राहावे लागते.बंगाली चित्रपटांमुळे आपण आपल्या संस्कृतीशी जोडलेलो राहतो, असे त्याचे मत असून त्यामुळे त्याला बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास खूप आवडते.हिंदी चित्रपटांमुळे तो व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एक अभिनेता म्हणून लोकांच्या लक्षात राहतो.निम्की मुखिया या मालिकेमुळे तो घराघरात पोहोचला असून आपण या मालिकेद्वारे आमदाराची भूमिका करत असल्याची त्याची भावना आहे.यासंदर्भात इंद्रनीलने सांगितले,“मला माझं क्षितीज व्यापक करायचं असून प्रत्येक माध्यमात काम करायचं आहे. माझं तेच काम आहे. कोलकाता हे कामाचं ठिकाण आहे.मी तिथे येतो काम करतो आणि पुन्हा परत जातो.मी शक्य तितक्या भूमिका रंगवण्याचा प्रयत्न करतो.मला अभिनयातून उत्पन्न आणि माझ्या सर्जनशील वृत्तीला समाधान मिळवायचं आहे.त्यामुळे मला पैसे मिळवून देणार्या चित्रपटांतून मी भूमिका साकारत राहणं आणि मला प्रसिध्दी आणि प्रशंसा मिळवून देणा-या मालिकांतूनही मी कामं करत राहीन.उत्कृष्ट कथा आणि सशक्त व्यक्तिरेखा असलेल्या या मालिकेतील भूमिकेमुळे प्रेक्षकांमध्ये माझ्याबद्दल एक अभिनेता म्हणून नेहीमीच पसंती मिळत राहणार यांत काही शंका नाही'.