झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये माधुरीने कलाकारांना दिला सुखद धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 11:50 IST2018-03-21T04:20:56+5:302018-03-21T11:50:23+5:30

झी चित्र गौरव सोहळ्याची संध्याकाळ सगळे कलाकार तयारी करत होते,अचानक एक आलिशान गाडी बॅकस्टेज ला येऊन थांबली सगळ्यांचा नजरा ...

Madhuri has given a nice push to Zee Chintan Gaurav awards! | झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये माधुरीने कलाकारांना दिला सुखद धक्का!

झी चित्र गौरव पुरस्कारांमध्ये माधुरीने कलाकारांना दिला सुखद धक्का!

चित्र गौरव सोहळ्याची संध्याकाळ सगळे कलाकार तयारी करत होते,अचानक एक आलिशान गाडी बॅकस्टेज ला येऊन थांबली सगळ्यांचा नजरा वळल्या, कारण ती गाडी होती बॉलिवूडची धकधक गर्ल “माधुरी दीक्षितची”.गाडीजवळ एकच गर्दी जमली, माधुरीने सगळ्यांना स्माईल दिली आणि मेकअप रूम मध्ये जाऊन बसली. सगळ्यांसाठी हा एक धक्काच होता काही वेळात निलेश साबळे आणि श्रेया बुगडे मेकअप रूममध्ये दाखल झाले. माधुरीने निलेश आणि श्रेया सोबत एका स्किट ची
रिहर्सल केली, आता वेळ होती स्टेजवर एन्ट्री करण्याची, माधुरीने एका स्किट मधून स्टेजवर एन्ट्री घेतली आणि एकचं टाळ्यांचा कडकडाट झाला.माधुरीने ज्या कारणासाठी झी चित्र गौरव पुरस्कारात हजेरी लावली होती ते कारण रिव्हील केलं,माधुरीचा पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा झाली त्या चित्रपटाचा नाव होत “Bucket List”. या वेळी या चित्रपटाचे कलाकारही उपस्थित होते. माधुरीच्या हस्ते मराठी चित्रपटसृष्टीत विशेष योगदानाबद्दल सादिक चितळीकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी सुमित राघवन आणि प्रसाद ओक यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.तर उमेश कामत - स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव - पर्ण पेठे, आदिनाथ कोठारे - प्राजक्ता माळी यांच्या डान्स परफॉर्मन्सने या सोहळ्यात बहार आणली.ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि मधू कांबीकर यांना या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तब्येत ठीक नसल्याने मधू कांबीकर येऊ शकल्या नाहीत.त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांच्या सुनेने स्वीकारला.तसेच मराठी पाऊल पडते हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शक अमित मसुरकर यांना देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात 'हम्पी' आणि 'कच्चा लिंबू' या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार मिळविले. 

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित जे काही करते त्याची आपसुकच चर्चा होते.मराठमोळ्या माधुरीचा अभिनय, डान्स, तिचं हास्य अशा प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा आहेत.त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून माधुरी रसिकांच्या काळजात घर करुन आहे. सध्या माधुरी रुपेरी पडद्यापासून काहीशी दूर आहे.तिचा कोणताही सिनेमा गेल्या काही महिन्यांत रसिकांच्या भेटीला आलेला नाही. असं असलं तरी विविध रियालिटी शोमध्ये ती झळकते. तिचा या शोमधील जजची भूमिकाही रसिकांना भावली. तर कधी माधुरी विविध पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहते. या सोहळ्यात उपस्थित राहत डान्सची झलक दाखवून ती उपस्थितांना मंत्रमुग्ध करते.



Web Title: Madhuri has given a nice push to Zee Chintan Gaurav awards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.