Video: 27 वर्षानंतर 'जुदाई'मधील गाण्यावर थिरकल्या माधुरी-उर्मिला; सुनीलनेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 11:30 AM2024-05-18T11:30:06+5:302024-05-18T11:31:58+5:30

Urmila matondkar: माधुरी, उर्मिला आणि सुनीलने “प्यार प्यार करते करते… तुम पे मरते मरते… दिल दे दिया दिल दे दिया”या गाण्यावर ताल धरला.

madhuri-dixit-urmila-matondkar-and-suniel-shetty-recreates-judaai-scene-and-dance-on-iconic-song | Video: 27 वर्षानंतर 'जुदाई'मधील गाण्यावर थिरकल्या माधुरी-उर्मिला; सुनीलनेही दिली साथ

Video: 27 वर्षानंतर 'जुदाई'मधील गाण्यावर थिरकल्या माधुरी-उर्मिला; सुनीलनेही दिली साथ

छोट्या पडद्यावर सध्या 'डान्स दिवाने' हा रिअॅलिटी शो तुफान गाजत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित (madhuri dixit) आणि सुनील शेट्टी (Suniel shetty) या शोच्या परिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहे.  या शोमध्ये प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटी गेस्टला आमंत्रित करण्यात येतं. आतापर्यंत करिश्मा कपूर, डॉ. श्रीराम नेने यांनी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. त्यांच्या नंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila matondkar) या शोमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या शोच्या मंच्यावर उर्मिलाने 'जुदाई' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्यासोबत सुनील शेट्टी आणि माधुरीनेही जुदाईमधील सुपरहिट गाण्यावर ताल धरला.

सध्या सोशल मीडियावर 'डान्स दिवाने'चा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्मिला, सुनील आणि माधुरी या तिघांनी तब्बल २७ वर्षानंतर जुदाई सिनेमातील “प्यार प्यार करते करते… तुम पे मरते मरते… दिल दे दिया दिल दे दिया”या गाण्यावर ताल धरला. या तिघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ९० चा काळ गाजवला आहे. ९० च्या दशकातील तिने ‘रंगीला’, ‘कौन’, ‘सत्या’, ‘भूत’, ‘कुंवरा’ यांसारखे सुपरहिट सिनेमा दिले आहेत.

Web Title: madhuri-dixit-urmila-matondkar-and-suniel-shetty-recreates-judaai-scene-and-dance-on-iconic-song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.