मधुरा देशपांडेचं तब्बल ३ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 11:28 IST2022-12-27T11:28:12+5:302022-12-27T11:28:28+5:30

Madhura Deshpande : अभिनेत्री मधुरा देशपांडे छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

Madhura Deshpande's comeback on small screen after 3 years will be seen in this series | मधुरा देशपांडेचं तब्बल ३ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत

मधुरा देशपांडेचं तब्बल ३ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत

नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनी सज्ज आहे. प्रेक्षकांची दुपार आणखी खास करण्यासाठी १६ जानेवारी पासून स्टार प्रवाह परिवारात दाखल होतेय नवी मालिका शुभविवाह. अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) या मालिकेत झळकणार असून तीन वर्षांनंतर ती शुभविवाहच्या निमित्ताने मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे. बहिणीच्या स्वप्नासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका.

भूमी या व्यक्तिरेखेविषयी सांगताना मधुरा म्हणाली, ‘तीन वर्षांच्या गॅपनंतर मी मालिकेत काम करत आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. कुटुंबावर भऱभरुन प्रेम करणारी भूमी कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करु शकते. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. 


ती पुढे म्हणाली की, आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी भावना मधुरा देशपांडेने व्यक्त केली. 

Web Title: Madhura Deshpande's comeback on small screen after 3 years will be seen in this series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.