छोट्या पडद्यावरील ही 'मॅडम'च्या सेक्सी अदांचे मालदीवमध्ये जलवे, सोशल मीडियावर फक्त तिच्या बिकीनी फोटोंची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 10:59 IST2017-11-27T05:29:48+5:302017-11-27T10:59:48+5:30

मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात ...

The 'Madam' on the small screen will burn in the Maldives, only on the social media, the talk of her bikini photos | छोट्या पडद्यावरील ही 'मॅडम'च्या सेक्सी अदांचे मालदीवमध्ये जलवे, सोशल मीडियावर फक्त तिच्या बिकीनी फोटोंची चर्चा

छोट्या पडद्यावरील ही 'मॅडम'च्या सेक्सी अदांचे मालदीवमध्ये जलवे, सोशल मीडियावर फक्त तिच्या बिकीनी फोटोंची चर्चा

ाठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. मे आय कम इन मॅडम या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहचली आहे. या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. अवघ्या काही दिवसांत नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. आपल्या सहका-यांशी बिनधास्त फ्लर्ट करणारी बॉस रसिकांना चांगलीच भावली आहे. मालिकेत आपल्या हॉट आणि सेक्सी अंदाजात रसिकांना घायाळ करणारी नेहा प्रत्यक्ष जीवनातही आपल्या मादक अदांची जादू दाखवत आहे. नेहा सध्या मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. याच व्हेकेशनचे काही फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मालदीवमध्ये नेहा सेक्सी आणि हॉट अंदाजात पाहायला मिळत आहे. त्यात नेहा एका स्विमिंग पूल शेजारी बिकीनीमध्ये दिसत आहे.




बिकीनीमधील नेहाच्या सेक्सी अदा आणि हॉट अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे. असाच एक दुसरा फोटोही नेहाने आपल्या फॅन्ससह शेअर केला आहे.



मालदीवच्या हॉटेल रुममधील नेहाचा हा फोटो आहे. हा फोटोही नेहाचा तितकाच सेक्सी आणि हॉट आहे. नेहा आपल्या हॉट अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या पोल डान्सचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोल डान्समधील नेहाची मादक अदा आणि सेक्सी फिगर यामुळे नेहाची बरीच चर्चा रंगली होती. 

पाहा: कोणत्या मराठी अभिनेत्रीने केला हा पोल डान्स,ज्यावर नेटीझन्स म्हणाले हा तर आहे 'मल्लखांब'

कलाकारांना त्यांच्या बिझी शेड्युल्डमुळे स्वत:साठी सहसा वेळ मिळत नाही. सतत लाईट, कॅमेरा आणि अ‍ॅक्शनच्या झगमगाटात राहणारे हे कलाकार कधी वेळ मिळालाच तर मस्त एन्जॉय करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी नेहाने पोल डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत ती एका गाण्यावर पोल डान्स करताना दिसतेय.हा पोल डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप  व्हायरल होत चर्चेचा विषय ठरला होता.कारण ज्या अंदाजात नेहा पेंडसे या व्हिडीओत पोल डान्स करताना दिसते त्या व्हिडीओला पाहून नेटीझन्स मात्र संभ्रमात होते.कारण नेटीझन्सनी लाईक्स कॉमेटस देत म्हटलं होते की, हा पोल डान्स पेक्षा मल्लखांबच करत असल्याचे जास्त वाटतंय. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी संमिश्र प्रतिक्रीया दिल्या होत्या.नेहाचा हा पोल डान्सचा प्रयत्न फसला असून तिने स्वतःच हसू सोशल मीडियावर करून घेतल्याची चर्चा मात्र त्यावेळी रंगली होती.

Web Title: The 'Madam' on the small screen will burn in the Maldives, only on the social media, the talk of her bikini photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.