एक दीवाना था फेम डॉनल बिष्ट पडली या गोष्टीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 11:56 IST2017-12-26T06:26:14+5:302017-12-26T11:56:14+5:30
आपल्याला सर्वांनाच साड्या आवडतात, होय ना? कारण साड्यांमुळे सर्व वयोगटाच्या आणि सर्व प्रकारच्या देहयष्टीच्या स्त्रियांचे सौंदर्य अधिक उठावदार दिसते ...

एक दीवाना था फेम डॉनल बिष्ट पडली या गोष्टीच्या प्रेमात
आ ल्याला सर्वांनाच साड्या आवडतात, होय ना? कारण साड्यांमुळे सर्व वयोगटाच्या आणि सर्व प्रकारच्या देहयष्टीच्या स्त्रियांचे सौंदर्य अधिक उठावदार दिसते आणि त्यामुळे स्त्रीच्या आयुष्यात साडीचे स्थान नेहमी खास असते. एक दीवाना था या मालिकेत डॉनल बिष्ट शरण्या ही भूमिका साकारत आहे. शरण्याला नऊवारी साडी घालायला खूप आवडते. अनेक वेळा सणासुदीला ती नऊवारी साडी आवर्जून घालते. नऊवारी साडीप्रमाणेच ती सहावारी साडीच्या देखील प्रेमात आहे. या मालिकेच्या आगामी भागांमध्ये ती आपल्याला अनेकवेळा साडींमध्ये पाहायला मिळणार आहे. मालिकेत साडी घालायला मिळणार असल्याने डॉनल बिष्ट सध्या खूपच खूश आहे. याविषयी डॉनल सांगते, “मला पहिल्यापासूनच साडी नेसायला खूप आवडते. साडीत स्टाइल आणि ग्लॅमर दोन्ही असते. स्त्रीचा हा सर्वात शालीन पोशाख साडी हाच आहे आणि मला तो अत्यंत लोकप्रिय आहे. मी कॉलेजच्या फेअरवेलला सर्वात पहिल्यांदा साडी नेसली होती, त्यावेळी माझ्या आईने मला तिची साडी नेसायला दिली होती. त्यानंतर अनेक खास प्रसंगात मी माझ्या आईची साडी नेसत असे. आता तर माझ्याकडे भरपूर साड्या आहेत आणि सणासुदीला साड्याच नेसायला मला आवडतात. माझ्या दृष्टीने साडी नेसल्यावर स्त्री ही खूपच छान दिसते आणि साड्या खूपच आरामदायक असतात आणि त्यातही कोणत्याही प्रसंगासाठी अनुरूप साडी तुम्ही नेसू शकता. एक दीवाना था या मालिकेत माझे नुकतेच लग्न झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत लग्नानंतर मी अनेकवेळा साडीमध्येच दाखवली जाणार आहे. मालिकेत आता नेहमीच साडी नेसायला मिळत असल्याने मी प्रचंड खूश आहे. मी क्रिएटिव्ह टीमला विनंती केली की, माझ्या साड्या निवडण्याची मुभा मलाच मिळावी. यासाठी त्यांनी देखील लगेचच होकार दिला.
एक दीवाना था या मालिकेत शरण्या आणि व्योम म्हणजेच विक्रम सिंह चौहानचे नुकतेच लग्न झाले असून ते आता त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागांमध्ये खूप नाट्य, रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Also Read : एक दीवाना था फेम डॉनल बिष्टच्या लेहंगाचे वजन ऐकून तुम्हालाही देखील बसेल आश्चर्याचा धक्का