आणखी एका पथेवर प्रकाशझोत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:41 IST2016-09-08T11:10:32+5:302016-09-08T16:41:10+5:30
बालिकावधू या मालिकेत बालविवाह या प्रथेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता तर ना आना इस देश लाडो या मालिकेत मुलीचा ...
.jpg)
आणखी एका पथेवर प्रकाशझोत
ब लिकावधू या मालिकेत बालविवाह या प्रथेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता तर ना आना इस देश लाडो या मालिकेत मुलीचा जन्म हा आजही अनेक समाजांमध्ये कशाप्रकारे वाईट मानला जातो यावर भाष्य करण्यात आले होते. आता देवांशी ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. ही मालिका देवदासी या प्रथेवर आधारित असणार आहे. आजही आपल्या समाजात अनेक देवदासी आहेत. देवांशी या मालिकेत देवांशी या देवदासी मुलीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका काश्वी कोठारी ही बालकलाकार साकारणार आहे. तसेच करुणा पांडेदेखील या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
![]()