आयुष्यभराची आनंदी साथ..! अखेर स्वानंदी-आशिषचा पार पडला विवाह सोहळा, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 19:36 IST2023-12-25T19:35:59+5:302023-12-25T19:36:31+5:30
Swanandi Tikekar-Ashish Kulkarni : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे जोरदार वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

आयुष्यभराची आनंदी साथ..! अखेर स्वानंदी-आशिषचा पार पडला विवाह सोहळा, फोटो आले समोर
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे जोरदार वारे वाहत आहेत. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. यामध्येच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. इंडियन आयडॉल १४ फेम गायक आशिष कुलकर्णी(Ashish Kulkarni)सोबत ती विवाहबद्ध झाली आहे. या लग्नाचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.
स्वानंदी सोशल मीडियावर सक्रीय आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आशिष कुलकर्णीसोबत लग्न करणार असल्याची खुशखबर दिली होती. तसेच तिने तिच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्याचे, विधींचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आयुष्यभराची आनंदी साथ. तिच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
स्वानंदीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत ती आणि आशिष पारंपारिक वेशात दिसत आहेत. तिने पर्पल रंगाची नववारी साडी नेसली आहे. केसांचा आंबाडा, केसात गजरा, नाकात नथ अशा गेटअपमध्ये स्वानंदी खूप सुंदर दिसते आहे. तर आशिषने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पर्पल रंगाचा धोतर नेसले आहे. त्यावर पर्पल रंगाची शाल घेतली आहे. तो देखील या वेशात राजबिंडा दिसत आहे. त्या दोघांच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. आशिषला 'इंडियन आयडॉल १२'मधून लोकप्रियता मिळवली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. याशिवाय मराठी चित्रपटातील गाणीही त्याने गायलीत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत आशिषने स्वतःची ओळख बनवली आहे. आशिष उत्तम गायक आहेच पण स्वानंदीलाही आईकडून गाण्याचा वारसा मिळालाय. स्वानंदी गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. आभाळमाया या मालिकेत तिने बालकलाकाराची भूमिका साकारली आहे. झी मराठीच्या अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई या मालिकेतून सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत झळकली होती.