​या तारेखपासून चला हवा येऊ द्या येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 07:51 AM2018-01-04T07:51:02+5:302018-01-04T13:21:02+5:30

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमात आज मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी ...

Let's come back from this star again to see the audience again | ​या तारेखपासून चला हवा येऊ द्या येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

​या तारेखपासून चला हवा येऊ द्या येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext
ा हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या कार्यक्रमात आज मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. हा कार्यक्रम सध्या काही दिवसांच्या ब्रेकवर गेलेला असल्याने या कार्यक्रमाचे फॅन्स या कार्यक्रमाला मिस करत आहे. पण या कार्यक्रमाच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या ८ जानेवारीपासून चला हवा येऊ द्याचा विश्वदौरा सुरू होणार आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर येणाऱ्या या विश्वदौऱ्यात चला हवा येऊ द्याची टीम आपल्यासोबत प्रेक्षकांना जगाची सफर घडवणार आहे. चला हवा येऊ द्याने आतापर्यंत लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. पोस्टमन काका, शांताबाई, जज, वकील, मामा-भाचे, सासू- सून, पुणेरी बाई अशी वेगवेगळी पात्रं आपल्या जगण्याचा भाग बनली. मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी या कार्यक्रमाने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. पत्रांच्या माध्यमातून हसवता हसवता लोकांच्या डोळ्यात पाणी देखील आणले आणि आता जगाच्या नकाशावर मोहोर उमटवायला ही सतरंगी मंडळी सज्ज झाली आहेत. 
८ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या चला हवा येऊ द्या विश्वदौऱ्याचे पहिले स्टेशन दुबई आणि अबुधाबी असणार आहे. कॉमेडीची आतषबाजी तर होणारच आहे शिवाय बॉलिवूड पार्क, फेरारी वर्ल्ड अशा अनेक ठिकाणांची सफर देखील कार्यक्रमाची टीम प्रेक्षकांना घडवणार आहे. चला हवा येऊ द्याच्या कलाकारांसोबत दुबई अबुधाबी दौऱ्यात खास पाहुणी म्हणून जाडूबाईची टीम अर्थात निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे असणार आहे. या दोन धमाल अभिनेत्रींसोबत विश्वदौऱ्याचा पहिला भाग रंगणार आहे. विश्वदौऱ्याच्या पुढील भागांमध्ये सुद्धा झी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकांमधले तुमचे लाडके चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
स्टुडिओची चौकट मोडून जगाची सफर करणारा मराठी टेलिव्हिजनवरचा हा पहिलाच कॉमेडी शो ठरणार आहे. दुबई अबुधाबी पाठोपाठ लंडन, पॅरिस, जपान, सिंगापूर, बाली, मॉरिशस, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि युएसए अशा जगभरातल्या महत्त्वाच्या शहरांत धुमाकूळ घालायला ही टीम सज्ज झाली आहे.

Also Read : लंडन देखा,पॅरिस देखा.... फिर देखा जपान..... फुल ऑन व्हेकेशन मूडमध्ये श्रेया बुगडे!

Web Title: Let's come back from this star again to see the audience again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.