मुझे कोई बचालो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:16 IST2016-10-10T10:03:23+5:302016-10-17T10:16:28+5:30

टीममधील सगळे कलाकार आणि टीमचे ट्युनिंग चांगले असले की ती केमिस्ट्री प्रेक्षकांना त्यांच्या मालिकेतही अनुभवायला मिळते. बहू हमारी रजनि_कांत या ...

Let me save someone | मुझे कोई बचालो

मुझे कोई बचालो

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">टीममधील सगळे कलाकार आणि टीमचे ट्युनिंग चांगले असले की ती केमिस्ट्री प्रेक्षकांना त्यांच्या मालिकेतही अनुभवायला मिळते. बहू हमारी रजनि_कांत या मालिकेचे सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे एकमेकांसोबत खूपच चांगले नाते आहे. या मालिकेत अनेक स्त्री कलाकार आहेत. त्यामुळे त्यांची मजा-मस्ती, गप्पा सेटवर नेहमीच सुरू असतात. या टीममधील रिधिमा पंडित, वाहबिझ दोराबजी, पल्लवी प्रधान, नेहा कौल या सगळ्याच महिला कलाकार मिळून मालिकेचे दिग्दर्शक नितिन जैन यांना खूपच सतवतात. त्यांना छळण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. याविषयी नेहा कौल सांगते, "आम्ही सगळे मिळून नितिन जैन यांची चांगलीच टर उडवत असतो. त्यांना आम्ही कोणत्या ना कोणत्या विषयावरून चि़डवत असतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आम्ही त्यांना इतके सतावतो की, ते आम्हा सगळ्या बायकांना प्रचंड घाबरतात." 

Web Title: Let me save someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.