गाण्यातून उलगडला लावणी सम्राट किरण कोरेचा प्रवास; तुमच्याही अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:05 PM2024-02-13T16:05:46+5:302024-02-13T16:06:25+5:30

लावणी सम्राट किरण कोरेचा प्रवास या गाण्यातून मांडण्यात आला आहे.

lawani samrat kiran kore ghungrachi chal song releasd have you watch | गाण्यातून उलगडला लावणी सम्राट किरण कोरेचा प्रवास; तुमच्याही अंगावर येईल काटा

गाण्यातून उलगडला लावणी सम्राट किरण कोरेचा प्रवास; तुमच्याही अंगावर येईल काटा

कलाकारांचं आयुष्य सोप्प नसतं. कलाकार मेहनत, जिद्द, काबाडकष्ट, मानअपमान तसंच संघर्ष कित्येक वर्षे करत असतो. तो दिवसागणिक घडत असतो. अश्याच एका कलाकाराच्या संघर्षाची खरी कहाणी कलावंत मराठी प्रस्तुत ‘घुंगराची चाळं’ गाण्यामार्फत मांडली आहे. लावणी सम्राट किरण कोरेचा प्रवास या गाण्यातून मांडण्यात आला आहे. या गाण्याच्या टिझरलाही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. आता नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

'घुंगराची चाळ' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात सुप्रसिद्ध लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर, निकीता भोरपकर आणि निलेश मुणगेकर हे कलाकार देखील आहेत. हे गाणं दर्शन घोष यांनी लिहिलं असून दिग्दर्शन ही त्यांनीच केलं आहे. या गाण्याला शुभम दुर्गुळे याने आवाज दिला आहे. या गाण्याला विपुल कदम यांनी संगीत दिलं आहे तर निलेश मुणगेकर निर्माते आहेत.

दिग्दर्शक दर्शन घोष गाण्याविषयी सांगतात, “अत्यंत आनंद होत आहे की, 'शंकर बाबा' या गाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर 'घुंगराची चाळ' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आणि ते गाणं सर्व प्रेक्षकांना आवडत आहे. 'घुंगराची चाळ' हे नुसतं गाणं नसून अनेक लाखो कलाकारांच्या जगण्याचा आकांत मी दाखवण्याचा या गाण्यातून प्रयत्न केला आहे. कलावंत मराठीच्या टीमची यात खूप मेहनत आहे. यापुढे आम्ही वेगवेगळ्या विषयांवर, खासकरून सामाजिक विषयांवर गाणी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असू.”     

निर्माते निलेश मनोहर मुणगेकर 'कलावंत मराठी'विषयी म्हणाले, “कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणं, हाच माझा कायम हेतू आहे. कोणताही कलाकार हा छोटा किंवा मोठा नसतो. छोटे असतात ते आपले विचार. म्हणून आपण काळासोबत आपले विचार बदलायला हवेत. मी आत्तापर्यंत नवनवीन कलाकारांसाठी १०० हून अधिक फॅशन शो, शॉर्ट फिल्म्स आणि म्युझिक अल्बम यांची निर्मिती केली आहे. यापुढे ही करत राहणार आहे. आपल्या मराठी कलावंतांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन.कलावंत मराठीच्या 'घुंगराची चाळ' या गाण्यासोबतच सर्व कलाविष्कारांवर प्रेक्षकांचं असंच प्रेम कायम असो. हीच सदिच्छा!!”

Web Title: lawani samrat kiran kore ghungrachi chal song releasd have you watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.