प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:12 IST2019-04-21T18:11:52+5:302019-04-21T18:12:38+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण आता सर्व फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो लाँच झाला आहे.

प्रतिक्षा संपली...लाँच झाला Bigg Boss Marathi 2 चा प्रोमो!! एकदा पाहाच...
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षक खूप उत्सुक आहेत Bigg Boss Marathi 2 या कार्यक्रमाच्या नव्या सीझनसाठी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण आता सर्व फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच बिग बॉस मराठी २ चा प्रोमो लाँच झाला आहे. आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का #BiggBossMarathi2 च्या घरात वर्दी? #ColorsMarathi#MaheshManjrekarpic.twitter.com/ZIzwRaZesm
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) April 21, 2019
Bigg Boss Marathi 2 च्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना यंदा बिग बॉसच्या घरात कोणाकोणाचा समावेश असणार याची उत्सुकता लागली होती. आज शोचे होस्ट महेश मांजरेकरांनी Bigg Boss Marathi 2 चा पहिला प्रोमो (बिग बॉस मराठी २ प्रोमो) शेअर करत त्याची हिंट दिली आहे. राजकीय प्रचाराची धामधूम यंदा बिग बॉसच्याही घरात दिसणार आहे. खुद्द महेश मांजरेकर राजकारण्याच्या वेषात पहायला मिळाले आहेत. शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का च्या घरात वर्दी? बिग बॉस मराठी 2 च्या पहिल्या प्रोमोनुसार यंदा घरात राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार अशी शक्यता वाढली आहे. आता ही व्यक्ती कोण असेल ? याचा अंदाज रसिक लावतीलच पण लवकरच हे नाव कोण असेल याचा उलगडा होणार आहे. ‘शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी... आश्वासनांचं झाड लावणारे, लावणार का बिग बॉस मराठी २ च्या घरात वर्दी? ’असा प्रश्न मांजरेकरांनी रसिकांना विचारला आहे.
Bigg Boss Marathi 2 ची घोषणा झाल्यापासून यंदाच्या पर्वात कोण कोणते सेलिब्रिटी झळकतील याचा अंदाज आणि चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रंगत आहेत. यामध्ये माझ्या नवऱ्याची बायको फेम रसिका सुनील पासून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील कलाकारांची नावं चर्चेमध्ये आहेत. लवकरच कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी २ हे नवं पर्व रंगायला सुरूवात होणार आहे.