परीकथेप्रमाणे दिव्यांका-विवेकचं प्री-वेडिंग फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 17:29 IST2016-07-05T11:59:45+5:302016-07-05T17:29:45+5:30

छोट्या पडद्यावरील रसिकांची रसिकांची लाडकी इशिमा अर्थात दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया 8 जुलैला रेशीमगाठीत अडकतायत. भोपाळमध्ये होणा-या ...

Like Latekar-Vivek's Pre-Wedding Photoshoot | परीकथेप्रमाणे दिव्यांका-विवेकचं प्री-वेडिंग फोटोशूट

परीकथेप्रमाणे दिव्यांका-विवेकचं प्री-वेडिंग फोटोशूट


/>


छोट्या पडद्यावरील रसिकांची रसिकांची लाडकी इशिमा अर्थात दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया 8 जुलैला रेशीमगाठीत अडकतायत. भोपाळमध्ये होणा-या लग्नासोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिव्यांका आणि विवेक आपली परफेक्ट लवस्टोरी कॅमे-यात कैद केलीय. लग्नाआधी केलेल्या फोटोशूटमध्ये या लव बर्ड्सची परफेक्ट केमिस्ट्री पाहायला मिळतेय.



यातील एका फोटोत विवेक आपल्या गुडघ्यावर उभा राहून लेडी लव्ह दिव्यांकाला बुके प्रेझेंट करताना दिसतोय. याच रोमँटिक फोटोला लग्नाचा पहिला फोटो असं मानलं जातंय.या फोटोत दिव्यांका आणि विवेकचा अंदाजही खास आहे.दिव्यांकानं बेबी पिंक कलरचा गाऊन परिधान केलाय. या गाऊनमध्ये दिव्यांका अगदी एखाद्या परीप्रमाणे भासतेय. दुसरीकडे गडद रंगाच्या सूटमध्ये विवेकचा अंदाजही डॅशिंग आणि तितकाच हँडसम दिसतोय.




नुकतंच दिव्यांका आणि विवेकनं आपलं प्री-वेडिंग फोटोशूट श्रीलंकेत केलं. या फोटोशूटमध्ये दिव्यांका नववधूप्रमाणे सजल्यासारखी पाहायला मिळतेय. विवेकचा अंदाजही खास असल्याचं या फोटोशूटमध्ये दिसतंय.



शुभमंगल सोहळ्याआधी समोर आलेल्या दिव्यांका आणि विवेकच्या फोटोशूटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. हे फोटो कुणालाही प्रेमात पाडतील असेच आहेत. 

Web Title: Like Latekar-Vivek's Pre-Wedding Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.