“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 16:46 IST2018-03-20T11:11:29+5:302018-03-20T16:46:54+5:30

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.  यातील सेलेब्रिटी गायक ...

The last five silvers received the platform of "Sur New Life New" program! | “सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार !

“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले अंतिम पाच शिलेदार !

र्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.  यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत.१५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच एकाही शिकायला मिळाले आता याच स्पर्धकांमधून फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत. “सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले आहेत अंतिम पाच शिलेदार त्यामुळे सुरांची स्पर्धा आता अजूनच रंगतदार होणार यात शंका नाही. शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या स्पर्धकांमध्ये रंगणार आता गाण्याची मैफल आणि महाराष्ट्राला मिळणार नवीन सूर... 
 
“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज, निहीराचा गोड आवाज, अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे. या कार्यक्रमाचा विजेता / विजेती कोण होईल ? यामध्ये प्रेक्षकदेखील त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला हा कार्यक्रम जिंकण्यासाठी मदत करू शकतात ते म्हणजे वोटने. आता प्रेक्षकांना त्यांचा आवडता स्पर्धक निवडण्याची वेळ आली आहे.

हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो,शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे.या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे

Web Title: The last five silvers received the platform of "Sur New Life New" program!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.