'लक्ष्मीनिवास' फेम स्वाती देवलची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली-"तू जादूचं जग दाखवलंस..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:54 IST2025-08-12T13:53:23+5:302025-08-12T13:54:25+5:30
Lakshminivas Serial fame Swati Deval: 'लक्ष्मीनिवास' मालिकेत मंगलाची भूमिका अभिनेत्री स्वाती देवलने साकारली आहे. नुकतेच अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

'लक्ष्मीनिवास' फेम स्वाती देवलची पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली-"तू जादूचं जग दाखवलंस..."
झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Lakshminiwas) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केलं. या मालिकेत मंगलाची भूमिका अभिनेत्री स्वाती देवल(Swati Deval)ने साकारली आहे. स्वाती देवल सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
स्वाती देवल हिने इंस्टाग्रामवर पती तुषार देवलसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, ''हॅप्पी बर्थडे माय लव्ह. तुझे माझे एक विश्व आपण दोघांनी उभं केलंय. एक छोटसं घरटं. त्यात एक पिल्लू आहे. कधीतरी ते ही मोठं होऊन भुरकन उडून जाईल. पण तुला मी आणि मला तू असेच राहणार आहोत. त्याचं जग ही मिळून पाहू… तुझ्या नजरेतून तू एक जादूच जग दाखवलास मला. ते प्रत्यक्षात उभे करायला काय आणि किती कष्ट घेतले ते आपणच जाणू. अजूनही खूप स्वप्न पाहिली आहेस. आपण मिळून ती पुर्ण करू असं वचन मी तुला तुझ्या वाढदिवसादिवशी देते. तुला खूप पुढे जायचंय. मी सतत तुझ्या बरोबर आहे. आणि संकटात नेहमीच तुझ्या पुढ्यात आहे…''
स्वातीने पुढे म्हटलं की, ''तुला तर माहितच आहे. ही तुषारी, तुषार शिवाय कोणीच नाही. अशीच साथ देत राहू.. फक्त मध्ये जे काही अचानक स्ट्रेस घेऊन बारीकसं आजारी पडून धक्का दिलास. त्यामुळे आता तर एकदमच माझी तुझ्या हातची पकड घट्ट केलीय मी.. तुला चांगलं आरोग्य, उत्तम अखंड आयुष्य लाभो आणि तुला जगतलं सगळं चांगलंच मिळो… चांगली माणसे, चांगली कामे, भरपूर यश अस सगळं मिळो. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…..लव्ह यू. हॅप्पी बर्थडे डिअर.''