'लाखात एक आमचा दादा'ला निरोप दिला अन् कलाकार महाराष्ट्राबाहेर या ठिकाणी गेले व्हॅकेशनसाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:29 IST2025-09-26T13:28:56+5:302025-09-26T13:29:27+5:30
'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सूर्या, त्याच्या बहिणी आणि तुळजा यांनी रसिकांच्या मनात घर केले. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

'लाखात एक आमचा दादा'ला निरोप दिला अन् कलाकार महाराष्ट्राबाहेर या ठिकाणी गेले व्हॅकेशनसाठी
झी मराठी वाहिनीवरील 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सूर्या, त्याच्या बहिणी आणि तुळजा यांनी रसिकांच्या मनात घर केले. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग अलिकडेच पूर्ण झालं आहे. या मालिकेचं शूटिंग संपल्यानंतर कलाकार महाराष्ट्राबाहेर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले आहेत.
मागील वर्षी जुलै महिन्यात लाखात एक आमचा दादा मालिका प्रसारीत झाली. १४ महिन्यात मालिकेनं आपला गाशा गुंडाळला आहे. ही मालिका सूर्यकांत उर्फ दादा आणि त्याच्या चार बहिणींच्या प्रेमकथेवर आधारित आहे, जिथे तो आपल्या बहिणींना चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबात लग्न लावण्यासाठी आपले जीवन समर्पित करतो. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. शेवटच्या भागाचं शूटिंग अलिकडेच पूर्ण झालं आहे. त्यानंतर आता या मालिकेतील कलाकार गोवा आणि गोकर्णा या ठिकाणी व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.
या मालिकेतील अभिनेता महेश जाधवने इंस्टाग्रामवर त्यांच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय त्यांनी जुई तनपुरेच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशनदेखील केले. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, जो किताबों में ना मिलें दोस्तोँ, ऐसी दास्ताँ हैं हम!! या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.