लोकप्रिय अभिनेत्री शेतात गाळतेय घाम, ओळखणंही झालं कठीण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:33 IST2025-07-07T12:32:13+5:302025-07-07T12:33:04+5:30

अभिनेत्री अभिनयाच्या झगमगाटात राहूनही आपल्या मातीशी घट्ट नातं टिकवून आहे.

Lakhat Ek Amcha Dada Serial Fame Actress Rajashri Nikam Working In Farm Share Video | लोकप्रिय अभिनेत्री शेतात गाळतेय घाम, ओळखणंही झालं कठीण!

लोकप्रिय अभिनेत्री शेतात गाळतेय घाम, ओळखणंही झालं कठीण!

मराठी मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत, जे अभिनयाच्या झगमगाटात राहूनही आपल्या मातीशी घट्ट नातं टिकवून आहेत. यशस्वी अभिनय कारकीर्द असूनही त्यांनी शेतीशी असलेली आपुलकी कधीच सोडली नाही. अनेक कलाकार शुटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून थेट शेतात रमताना दिसतात. अलीकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती शेतात घाम गाळताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

अभिनेत्री राजश्री निकम यांच्या  एक व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये राजश्री निकम या आनंदाने कापणी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी शेती आणि एन्जॉय असं लिहलं.  त्यांच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केलाय. अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही राजश्री यांच्या या व्हिडीओवर 'ताई' अशी कमेंट केली.


राजश्री निकम या एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत.  त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.  चाहतेही त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. राजश्री निकम सध्या झी मराठी वाहिनीवरील 'लाखात एक आमचा दादा; या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेत त्या सुर्यादादाच्या आईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
 

Web Title: Lakhat Ek Amcha Dada Serial Fame Actress Rajashri Nikam Working In Farm Share Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.