'क्योंकी सास भी...'च्या एका एपिसोडसाठी फक्त १८०० रुपये घ्यायची तुलसी, आता किती कमावतात खासदार स्मृती इराणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:09 IST2025-07-09T16:08:25+5:302025-07-09T16:09:04+5:30
इतक्या वर्षांनंतर खासदार झालेल्या स्मृती इराणी तुलसी साकारण्यासाठी किती पैसे घेतात, हे तुम्हाला माहित आहे का?

'क्योंकी सास भी...'च्या एका एपिसोडसाठी फक्त १८०० रुपये घ्यायची तुलसी, आता किती कमावतात खासदार स्मृती इराणी?
'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही टीव्हीवरील सगळ्यात गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली मालिका. प्रत्येक घराघरात ही मालिका पाहिली जायची. 'क्योंकी सास भी कभी बहु थी'मधील तुलसी प्रत्येकाला आपल्या घरातलीच वाटायची. या मालिकेने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातून पुन्हा एका स्मृती इराणी तुलसी बनून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
तुलसी या भूमिकेने स्मृती इराणी यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. या मालिकेतूनच त्या घराघरात पोहोचल्या होत्या. आता १७ वर्षांनी त्या पुन्हा एकदा तुलसीच्या रुपात दिसणार आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहु थी'च्या सीक्वलचा टीझरही नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये बदललेल्या तुलसीचा अवतार पाहायला मिळत आहे. पण, इतक्या वर्षांनंतर खासदार झालेल्या स्मृती इराणी तुलसी साकारण्यासाठी किती पैसे घेतात, हे तुम्हाला माहित आहे का?
मीडिया रिपोर्टनुसार, सुरुवातीला 'क्योंकी सास भी कभी बहु थी'च्या एका एपिसोडसाठी स्मृती इराणी या १८०० रुपये घ्यायच्या. मात्र, आता त्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये फी घेतात. 'क्योंकी सास भी कभी बहु थी'च्या या नव्या सीझनमध्ये तुलसीची भूमिका साकारण्यासाठी स्मृती इराणी या एका एपिसोडचे १४ लाख रुपये घेतात.
२००० साली 'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिका सुरू झाली होती. ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर २००८ मध्ये मालिकेने निरोप घेतला. आता नव्या दमात पुन्हा मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या २९ जुलैपासून दररोज रात्री १०.३० वाजता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.