​कुशाल टंडन म्हणतो, ‘बिग बॉस’मध्ये जाणे सर्वात मोठी चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 21:29 IST2016-04-01T04:29:02+5:302016-03-31T21:29:02+5:30

 टेलिव्हिजनवर दिसूनही कुशाल टंडन हे नाव फारसे कुणीही ओळखत नव्हते. पण कुशाल ‘बिग बॉस-७’चा स्पर्धक बनला आणि एका रात्रीत ...

Kushal Tandon says, 'Biggest boss' is the biggest mistake | ​कुशाल टंडन म्हणतो, ‘बिग बॉस’मध्ये जाणे सर्वात मोठी चूक

​कुशाल टंडन म्हणतो, ‘बिग बॉस’मध्ये जाणे सर्वात मोठी चूक

 
ेलिव्हिजनवर दिसूनही कुशाल टंडन हे नाव फारसे कुणीही ओळखत नव्हते. पण कुशाल ‘बिग बॉस-७’चा स्पर्धक बनला आणि एका रात्रीत प्रकाशझोतात आला. ‘बिग बॉस-७’मधील गौहर खान हिच्यासोबतचे त्याचे अफेअर, शोमधील त्याचा आक्रमक स्वभाव यामुळे कुशालला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.एवढेच काय, तर सलमान खानच्या सोशल सर्कचा फायदाही त्याला मिळाला. गौहरसोबतचा म्युझिक व्हिडिओ आणि त्यानंतर आणखी एक रिअ‍ॅलिटी शो हे सगळे ‘बिग बॉस-७’च्या पुण्याईनेच कुशालच्या पदरात पडले. खरे तर, एवढे ऐकून कुशालने ‘बिग बॉस-७’चे आभार मानायला हवेत, असे कुणीही म्हणेल. पण कुशालने धक्कादायक स्टेटमेंंट दिले आहे. ‘बिग बॉस-७’मध्ये जाणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे टिष्ट्वट त्याने केले आहे. यामागचे कारण काय, तोच जाणो...पण बुडत्याचे पाय डोहात, म्हणतात, ते यालाच...

 

 

Web Title: Kushal Tandon says, 'Biggest boss' is the biggest mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.