कुमकुम भाग्य फेम शब्बीर आहुवालियाची पत्नी ​कांची कौलचा कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:55 IST2017-05-22T09:25:15+5:302017-05-22T14:55:15+5:30

कांची कौलने एक लडकी अंजनीसी, मायका यांसारख्या चित्रपटात तर वो तेरा नाम था यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. कांची ...

Kumkum Bhagya Fame Shabbir Ahuwaliya's wife Kanchi Kaul's Comeback | कुमकुम भाग्य फेम शब्बीर आहुवालियाची पत्नी ​कांची कौलचा कमबॅक

कुमकुम भाग्य फेम शब्बीर आहुवालियाची पत्नी ​कांची कौलचा कमबॅक

ंची कौलने एक लडकी अंजनीसी, मायका यांसारख्या चित्रपटात तर वो तेरा नाम था यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. कांची कौलने प्रसिद्ध अभिनेता शब्बीर आहुवालियासोबत लग्न केले आणि त्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करण्याचे प्रमाण कमी गेले. आता त्या दोघांना दोन मुलेदेखील आहेत. संसारात रमल्यामुळे कांची छोट्या पडद्यापासून दूर गेली आहे. पण आता तिने अभिनयाकडे वळण्याचे ठरवले आहे. तिने तिच्या नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली असून ती सध्या तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी बँकॉकमध्ये चित्रीकरण करत आहे आणि तिने ही बातमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सना दिली आहे. पुन्हा काम करण्यासाठी ती खूपच उत्सुक असल्याचे ती सांगते. 
कांचीने तिच्या चित्रीकरणाच्या वेळेचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत ती मेकअप करत असताना आपल्याला दिसत आहे. इन्स्टाग्रामला फोटो शेअर करत असताना तिने लिहिले आहे की, गेली तीन वर्षं ही माझ्या आयुष्यातील खूप खास होती. या तीन वर्षांत माझ्या आयुष्यात खूप बदल घडला. मी काम करायचे सोडले. पंचवीस किलो वजन माझे दोनदा वाढले आणि मी दोनदा गोंडस मुलांना जन्म दिला. माझ्या या दोन्ही मुलांच्या रूपाने मला खूप सुंदर गिफ्ट मिळाले. त्यांच्यामुळे आईपण काय असते हे मला कळले. गेल्या हजार दिवसांपासून मी सगळ्यात जास्त जे मिस करत होते, तिथे मी परतत आहे. मी पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली असून माझे हे काम मला खूपच आवडत आहे. 
शब्बीर आहुवालिया आणि कांची कौल यांनी 2011मध्ये लग्न केले होते तर 2014 मध्ये कांचीने त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. 

Web Title: Kumkum Bhagya Fame Shabbir Ahuwaliya's wife Kanchi Kaul's Comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.