अंजली आनंदला या व्यक्तिसोबत करायचे आहे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:54 IST2018-08-02T14:52:53+5:302018-08-02T14:54:09+5:30

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेतील अंजलीचे देखील खऱ्या आयुष्यात लग्न झालेले नाही. तिला कोणासोबत लग्न करायला आवडेल हे तिने नुकतेच सांगितले आहे.

Kullfi Kumarr Bajewala fame Anjali Anand wants to marry with her best friend | अंजली आनंदला या व्यक्तिसोबत करायचे आहे लग्न

अंजली आनंदला या व्यक्तिसोबत करायचे आहे लग्न

अभिनेत्री अंजली आनंद सध्या स्टार प्लसवरील कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेत दिसत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेत्री अंजली आनंद लव्हली सिंगची भूमिका साकारत असून ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत लव्हली आपल्या लग्नाबद्दल आणि तिला कसा मुलगा पाहिजे याविषयी सतत बोलत असते.

कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेतील अंजलीचे देखील खऱ्या आयुष्यात लग्न झालेले नाही. तिला कोणासोबत लग्न करायला आवडेल हे तिने नुकतेच सांगितले आहे. अंजलीचे वडील हे अभिनेते असल्याने लहानपणापासूनच ती फिल्मी बँकराऊंडमध्ये वाढलेली आहे. ती अभिनेता दिनेश आनंद यांची मुलगी आहे. गुप्त, मोहरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.

अंजलीचे वडील बॉलिवूडमध्ये असल्याने तिला लहानपणापासूनच बॉलिवूडविषयी आकर्षण होते. ती बॉलिवूडची मोठी चाहती आहे आणि त्यातही तिला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट खूपच आवडतो. या चित्रपटामधील राहुल आणि अंजली यांच्याप्रमाणे आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत तिला लग्न करायचे आहे असे ती सांगते.
 
कुल्फी कुमार या मालिकेतील तिचे आणि सिंकदरचे नाते ज्याप्रकारे दाखवले आहे तसे नाते तिला तिच्या जोडीदारासोबत नसावे असे तिला वाटते. कारण सिकंदर आणि लव्हली यांच्यात प्रेम नसून ते आपले लग्न टिकावे म्हणून प्रयत्न करत आहेत. कुछ कुछ होता है या चित्रपटात राहुल आणि अंजलीचे नाते ज्याप्रकारे आहे, त्याचप्रकारे तिचे आणि तिच्या पतीचे नाते असावे असे तिचे म्हणणे आहे. आपल्या लग्नाबद्दल अंजली सांगते, “मला नक्कीच लग्न करायचे आहे. पण मला असा मुलगा हवा आहे जो आधी माझा बेस्ट फ्रेंड बनेल आणि मग माझा जोडीदार... ज्याच्यासोबत मी सगळं काही शेअर करू शकेन आणि जो मला जज करणार नाही.”
 

Web Title: Kullfi Kumarr Bajewala fame Anjali Anand wants to marry with her best friend