'चंद्राकाता' बनलेल्या क्रितिका कामराला स्वत:ची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर पाहणे आवडत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 17:51 IST2017-06-27T12:13:43+5:302017-06-27T17:51:42+5:30

अभिनेत्री क्रितिका कामरा 'प्रेम या पहेली चंद्रकांता'मध्ये राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. एरव्ही ...

Kristi Kamar, who made 'Chandrakata', does not like to watch TV series on his own? | 'चंद्राकाता' बनलेल्या क्रितिका कामराला स्वत:ची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर पाहणे आवडत नाही?

'चंद्राकाता' बनलेल्या क्रितिका कामराला स्वत:ची भूमिका असलेली मालिका टीव्हीवर पाहणे आवडत नाही?

िनेत्री क्रितिका कामरा 'प्रेम या पहेली चंद्रकांता'मध्ये राजकन्या चंद्रकांताची भूमिका साकारत आहे. तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे. एरव्ही मालिका पाहण्याचे आग्रहाने रसिकांना सांगणारी क्रितिका कामराच टीव्ही पाहात नाही.इतकेच काय तर ती भूमिका साकारत असलेली मालिका चंद्रकांता टीव्हीवर नाही तर ऑनलाईन पाहात असते.सध्या मालिका या टीव्हीवर कमी आणि ऑनलाईनच जास्त लोकप्रिय होत आहे. त्यामुळे वेबसिरीज हे मनोरंजनाचे उत्तम माध्यम असल्याचे तिला वाटते. सूत्रांनी सांगितले की तिला आपला नवीन टेलिव्हिजन शो प्रेम या पहेली चंद्रकांता ऑनलाईन आपल्या मेकअप रूममध्ये पाहायला आवडतो.क्रितिका म्हणते, “डिजिटली सगळ्या गोष्टी मी माझ्या वेळेत पाहू शकते. मी माझ्या फोनवर अनेक मूव्हीज आणि शोज्‌ पाहते. सकाळी उठल्या उठल्या प्रथम टि्‌वटर चेक करते.सगळ्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर मिळत असेन तर मी इतर गोष्टींवर का अवलंबून राहु.तिला शॉर्ट फिल्म्स आवडतात कारण त्यांना खूप वेळ लागत नाही आणि त्या पटकन मुद्दयावर येतात. अशा प्रकारची प्रॉडक्शन्स वेगळा दृष्टीकोन मांडतात हेही तिला आवडते. तिथे नवीन आणि वेगळे प्रयोग होतात. कसलेच बंधन नसल्यामुळे  हे माध्यम भक्कम आहे आणि खासकरून तरूणांसाठी मोठा प्लॅटफॉर्म बनत असल्यामुळे भविष्यात खूप चांगले कंटेट आपल्याला पाहायला मिळतील. मला आनंद वाटतो की मला वेब सीरिज आणि शॉर्ट फिल्म्समध्ये कामासाठी विचारण्यात येत आहे. मला फक्त टेलिव्हिजनवरील अभिनेत्री बनून राहायचे नाहीये. मला वेगवेगळ्‌या माध्यमांमधून काम करायचे आहे.” असेही क्रितिका सांगते. क्रितिका वेब कॉन्टेन्टसाठी जास्त आकर्षकही वाटते कारण ते टीव्हीवरील प्रमाणित कॉन्टेन्टपेक्षा वेगळे असते.वेबसिरीज आल्यामुळे टीव्हीला दुय्यम दर्जा देत असल्याचे अनेकांना वाटत असणार पण तसे नसून दोन्ही माध्यमांची आपापली एक वैशिष्ट्य आहेत.मुळात टीव्ही मुळेच कलाकरांना एक वेगळी ओळख मिळते हे ही विसरून चालणार नाही असेही क्रितिकाने सांगितले.मला नाही वाटत की डिजिटल वर्ल्डमुळे अन्य माध्यमांना काही धक्का बसेल कारण टेलिव्हिजन एका वेगळ्‌या स्तरावर आहे आणि त्याची पोहोच खूपच मोठी आहे. देशातील अगदी दुर्गम भागांमध्येही तुम्हांला टीव्ही पाहायला मिळेल.” असे तिने तिचे मत व्यक्त केले.

क्रितिका कायम आपल्या फोनवर असेल पण ती सोशल मीडियावर तेवढी सक्रिय नाहीये. ती मान्य करते की ती केवळ पीअार प्रेशरमुळे ऑनलाईन असते. कायमच अपडेटेड राहणे किंवा सतत काही ना काही पोस्ट करत राहणे हे खूपच वेळ वाया घालवणारे काम आहे. काही वेळा मी आनंदात असते आणि सेल्फी काढायला विसरते आणि दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात येतं की आपल्याकडे पोस्ट करायला काहीच नाहीये. ट्‌वीटही दिवसभर करत राहण्याची गरज मला वाटत नाही. मला ऑनलाईन राहायला आवडतं पण मी टेक्नाॅसॅव्ही नाहीये.ब-याचदा इतर कलाकार कुठे जेवायला जातात त्याचेही अपडेट सोशल मीडियावर देताना दिसतात.मात्र खासगी आयुष्यात सोशल मीडियाची ढवळाढवळ आवडत नाही.एक कलाकार म्हणून तुम्ही स्वतःवर प्रेम करायला हवं. पण मी तशी नाहीये. मी स्वतःची खूप समीक्षा करते आणि गोष्टी पोस्ट करण्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागते.” असेही क्रितिकाने सांगितले. 

Web Title: Kristi Kamar, who made 'Chandrakata', does not like to watch TV series on his own?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.