n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">कृष्णा अभिषेकची बहीण आणि आरती सिंगने त्याला नुकतेच खूपच चांगले सरप्राईज दिले. सध्या कृष्णा अभिषेक त्याच्या कॉमेडी नाईटस बचाओ आणि कॉमेडी नाईटस लाईव्ह या दोन कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. तसेच तो ओएमजी! ये मेरा इंडिया या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक करत आहे. तर आरती वारिस या मालिकेत काम करत आहेत. दोघेही आपापल्या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्यांना एकमेकांना भेटताच येत नाही. त्यामुळे आरतीने अभिषेकला ओएमजी! ये मेरा इंडिया या कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन सरप्राईज दिले. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी कृष्णा जगातील अनेक देशांना भेटी देणार आहे. त्यामुळे कृष्णाला पुन्हा कित्येक महिने तिला भेटता येणार नाही. त्यामुळे त्या दोघांनी भेटून खूपच मजा-मस्ती केली.