लग्नाच्या विचाराने नर्व्हस झाली किश्वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 19:58 IST2016-12-10T19:57:39+5:302016-12-10T19:58:57+5:30

गेली कित्येक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलेले किश्वर मर्चंट आणि सुयश राय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी ...

Kishvar became nervous after marriage | लग्नाच्या विचाराने नर्व्हस झाली किश्वर

लग्नाच्या विचाराने नर्व्हस झाली किश्वर

ली कित्येक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिलेले किश्वर मर्चंट आणि सुयश राय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी त्यांचा विवाह असून, दोघांकडून विवाहाची जोरदार तयारी केली जात आहे; मात्र जेमतेम दिवस राहिलेल्या लग्नाच्या विचाराने किश्वर नर्व्हस झाल्याचे समजते. 

याविषयी किश्वरने सांगितले की, लग्नाच्या विचाराने मी नर्व्हस झाली असले तरी, उत्साहित आहे. जसजसे लग्नाचे दिवस जवळ येत आहेत, तसा माझ्यातील उत्साह वाढत आहे. एक मात्र मला आवर्जून सांगावेसे वाटते की, सुयश माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. आमच्या सुखी संसारासाठी मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हवेत, असेही किश्वर म्हणाली. किश्वर सध्या ‘ब्रह्मराक्षस’ या प्रसिद्ध मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत काम करीत आहे. 

बिग बॉसच्या गेल्या सिझनमध्ये किश्वर आणि सुयश एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये राहत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून, १६ डिसेंबर रोजी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. 



किश्वर मर्चंट आणि सुयश राय

Web Title: Kishvar became nervous after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.