किशोरी शहाणेचा मुलासोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणतायेत ही तर संतूर मम्मी !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 11:49 AM2021-07-09T11:49:12+5:302021-07-09T11:58:10+5:30

किशोरी शहाणे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात.

Kishori Shahane's Dance with her son trending, fans amazed & refers santoor Mummy | किशोरी शहाणेचा मुलासोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणतायेत ही तर संतूर मम्मी !

किशोरी शहाणेचा मुलासोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणतायेत ही तर संतूर मम्मी !

googlenewsNext

विविध मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत किशोरी शहाणे यांनी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवले आहे. शिवाय स्वतःचा फिटनेस कायम टिकून रहावा यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत असतात. त्यांचं या वयातही फिटनेसबाबत सजग असणं आणि त्यांनी टिकवलेलं सौंदर्य याचं चाहत्यांना कमालीचं अप्रूप वाटतं. 


त्यांच्या  इन्सटाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर आपल्याला कळून येईल की किशोरी किती फिटनेसबाबत जागरुक आहे आणि त्यामुळेच की काय त्यांच सौंदर्य आजही अबाधित आहे. किशोरी ५३ वर्षांच्या आहेत  तरीही त्यांच्या फोटोंकडे पाहिले असता आपल्याला किशोरी यांच्या वयाचा अंदाजा लावणे मुश्किल आहे. त्यामुळेच की काय तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची मालकीण असलेल्या किशोरी शहाणे दर्जेदार भूमिकेतून रसिकांचे मनोरंजन करतात. 

किशोरी शहाणे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत किशारी त्यांच्या मुलासोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहतेही कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे डान्स करताना किशारीमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. यांत आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना त्या कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


किशोरी यांच्या मुलाचे नाव  बॉबी वीज असे आहे. बॉबीदेखी आपल्या आई वडिलांप्रमाणेच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे. उत्तम डान्सर , अभिनेता आणि मॉडेल आहे. किशोरी सध्या  ‘गुम है किसिके प्यार में’ या हिंदी मालिकेत झळकत आहे. मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेलाही रसिकांची विशेष पसंती मिळत आहे. 

Web Title: Kishori Shahane's Dance with her son trending, fans amazed & refers santoor Mummy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.