किशोरी बनली देवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 13:15 IST2016-05-04T07:45:08+5:302016-05-04T13:15:08+5:30

अभिनेत्री किशोरी शहाणे लाईफ ओकेवरील नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत मनसा नावाच्या नागदेवीची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने ...

Kishori Beelhi Devi | किशोरी बनली देवी

किशोरी बनली देवी

िनेत्री किशोरी शहाणे लाईफ ओकेवरील नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत मनसा नावाच्या नागदेवीची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्या कित्येक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर होत्या.

पण या मालिकेत त्यांना एक वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याने त्यांनी या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेत त्या एका देवीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. याविषयी किशोरी म्हणाल्या, या मालिकेत माझी वेशभूषा, रंगभूषा पूर्णपणे वेगळी असणार आहे.

विशेष म्हणजे मी या मालिकेत कित्येक लाखांचे दागिने घालणार आहे. तसेच माझ्या डोक्यावर सतत मुकूट असणार आहे. या मुकुटाची किंमतही जवळजवळ एक लाख रुपये आहे.

तसेच हा मुकुट वजनानेही अतिशय जड आहे. त्यामुळे चित्रीकरण करताना काही वेळानंतर माझे डोके प्रचंड दुखायला लागते. पण तरीही माझी ही भूमिका मी एन्जॉय करत आहे. 

Web Title: Kishori Beelhi Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.