​निकी अनेजा इश्क गुनाह या मालिकेद्वारे करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 16:05 IST2017-07-12T10:35:57+5:302017-07-12T16:05:57+5:30

निकी अनेजाने नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बात बन जाये, दास्तान, अंदाज, सी हॉक्स यांसारख्या मालिकांमधील तिच्या ...

Kickback by Nicky Enza Ishq Gunah | ​निकी अनेजा इश्क गुनाह या मालिकेद्वारे करणार कमबॅक

​निकी अनेजा इश्क गुनाह या मालिकेद्वारे करणार कमबॅक

की अनेजाने नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बात बन जाये, दास्तान, अंदाज, सी हॉक्स यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिची अस्तित्व... एक प्रेम कहानी ही मालिका तर प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर ती गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदी मालिकांमध्ये काम करत नाहीये. तिने दरम्यानच्या काळात काही इंग्रजी मालिकांमध्ये काम केले होते. निकीने 2002 मध्ये सोनी वालियासोबत लग्न केले असून ती गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्ये राहात आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती तिच्या संसारात आणि मुलांमध्ये रमली असल्याने खूपच कमी काम करत आहे. पण निकीच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. निकी लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. स्टार प्लस वाहिनीवर लवकरच इश्क गुनाह ही मालिका येणार असून या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेची कथा खूपच वेगळी असणार असून या मालिकेतील तिची भूमिका खूपच आव्हानात्मक असल्याचे म्हटले जात आहे. 
निकी अनेजा छोट्या पडद्यावर परतणार अशी गेल्या वर्षीदेखील चर्चा होती. पण काही कारणास्तव ती मालिकेत काम करू शकली नाही. पण आता ती प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
निकी अनेजा गेल्यावर्षी शानदार या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने अलिया भट्टच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. 
अस्तित्व ही मालिका 2002-2006च्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेनंतर जवळजवळ 11 वर्षांनंतर ती छोट्या पडद्यावर परतणार आहे. तिच्या या कमबॅकसाठी ती खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. 

Also Read : कल आज और कल. पाहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार आता...

Web Title: Kickback by Nicky Enza Ishq Gunah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.