Khatron Ke Khiladi 8: हिना खान स्विकारणार हे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 16:13 IST2017-05-19T10:43:06+5:302017-05-19T16:13:06+5:30

 'खतरों के खिलाडी' 8 सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित शेट्टी या सिझनला होस्ट करणार असल्यामुळे रसिकांमध्ये या ...

Khatron Ke Khiladi 8: Challenge to accept Hina Khan | Khatron Ke Khiladi 8: हिना खान स्विकारणार हे चॅलेंज

Khatron Ke Khiladi 8: हिना खान स्विकारणार हे चॅलेंज

 &#
39;खतरों के खिलाडी' 8 सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रोहित शेट्टी या सिझनला होस्ट करणार असल्यामुळे रसिकांमध्ये या शोसाठी कमालीची उत्सुकता वाढली आहे. गीता फोगाट, लोपामुद्रा राऊत,मनु पंजाबी, मनवीर गुर्जर, करन वाही, शांतनु माहेश्वरी, शिवानी डांडेकर, निया शर्मा, हिना खान, रवि दुबे, मोनिका डोगरा, शाइनी दोशी, रित्विक धन्जानी यामध्ये आता आणखी एका ग्लॅमरस अभिनेत्रीचे नाव जोडले जाणार असल्याची माहिती मिळतेय. ब-याच दिवसांपासून टीव्हीपासून लांब असलेली सगळ्यांची लाडकी अक्षरा आता एका वेगळ्याच भूमिकेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. 'खतरो के खिलाडी'च्या 8 व्या सिझनमध्ये अक्षरा म्हणजेच हिना खान वेगवेगळी आव्हानं स्विकारताना दिसणार आहे. चाकोरीबध्द भूमिकेत झळकण्याची हिनाची ईच्छा नव्हती तिला काही तरी हटके करायचे होते.खरंतर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अक्षरा या भूमिकेच्या माध्यमातून  घराघरांत पोहचलेली हिना खानला याच मालिकेने खरी ओळख मिळवून दिली होती. त्यामुळे आता हिनाला अक्षरा ही इमेज ब्रेक करायच्या प्रयत्नात होती.त्यानुसार आता ती  खतरों के खिलाडी या शोला तिने होकार दिल्याचे कळतंय. ये रिश्ता क्या कहलाता है मालिका सोडल्यानंतर अक्षरा (हिना खान) कोणत्या मालिकेत झळकणार असे अनेक प्रश्न तिला विचारताना दिसत होते.आता  पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर हिना झळकणार म्हटल्यावर तिचे चाहते ही नक्की खूश होतील यांत काही शंकाच नाही. मुळात खुद्द हिनानेच तिची ही खुशखबर सोशल मीडियावर शेअर केली आहे.नेहमी अक्षराला रसिकांनी आदर्श सुनेच्या भूमिकेत पाहिलंय, आता या शोमध्ये तिचे वेगळेच रूपं पाहायला मिळेत त्यामुळे हिना खानच्या या नव्या भूमिकेला रसिक कितपत पसंत करतात हे पाहणे ही तितकच रंजक ठरणार आहे. 




Web Title: Khatron Ke Khiladi 8: Challenge to accept Hina Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.