​​किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखच्या जवळकीमुळे रोचेल राव चिंतेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 11:31 IST2017-04-18T06:01:30+5:302017-04-18T11:31:30+5:30

रोचेल राव आणि किथ सिक्वेरा यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून अफेअर आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहायला मिळते. एवढेच नव्हे ...

Keith Sequerera and Sanjida Sheikh are close to Roble Rao worried? | ​​किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखच्या जवळकीमुळे रोचेल राव चिंतेत?

​​किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखच्या जवळकीमुळे रोचेल राव चिंतेत?

चेल राव आणि किथ सिक्वेरा यांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून अफेअर आहे. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्येदेखील ते दोघे एकत्र झळकले होते. त्यावेळी या दोघांच्या केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. 
किथ सध्या लव्ह का है इंतजार या मालिकेत काम करत आहे. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वेळ हा सध्या या मालिकेच्या चित्रीकरणात जात आहे. मालिकेच्या सेटवरच दिवसातील अधिकाधिक वेळ जात असल्याने त्याला कुटुंबीयांना, मित्रमैत्रिणींना वेळच द्यायला मिळत नाही. या मालिकेत संजीदा शेख त्याच्या नायिकेच्या भूमिकेत असून या मालिकेत सोनी रजनान प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेद्वारे त्या अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 
किथ सध्या मालिकेचे चित्रीकरण करत असल्याने त्याला रोचेललादेखील वेळ देता येत नाहीये आणि त्यात या मालिकेतील एका प्रसंगासाठी संजीदा आणि किथ यांना नुकतेच अनेक प्रणयदृश्य साकारावी लागली होती. या दृश्यांच्यावेळी ते एकमेकांच्या खूपच जवळ आले होते असे म्हटले जात आहे. किथ आणि संजीदा यांच्यातील या वाढत्या जवळकीमुळे रोचेल प्रचंड अस्वस्थ झाली असल्याची चर्चा आहे. यामुळे ती किथवर खूपच चिडली आहे आणि तिने तिला आलेल्या रागाचे कारणदेखील किथला सांगितले आहे. यावर किथने रोचेलची मनधरणी केली आहे. मालिकेसाठी त्याला असे दृश्य द्यावे लागले असे त्याने तिला सांगितले आहे. त्यावर रोचेललादेखील मालिकेत त्या दृश्याची खरेच गरज होती हे पटले आहे आणि ती शांतदेखील झाली आहे. 

sanjeeda sheikh keith sequeira

Web Title: Keith Sequerera and Sanjida Sheikh are close to Roble Rao worried?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.