किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखला आहे लव्ह का है इंतजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 06:42 AM2017-04-26T06:42:37+5:302017-04-26T12:12:37+5:30

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि राजस्थानमधील शाही घराण्यातील राजकुमार यांची प्रेमकथा प्रेक्षकांना लव्ह का है इंतजार या मालिकेत पाहायला मिळणार ...

Keith Sequeraa and Sanjida Shaikh have been waiting for Love | किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखला आहे लव्ह का है इंतजार

किथ सिक्वेरा आणि संजीदा शेखला आहे लव्ह का है इंतजार

googlenewsNext
लिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि राजस्थानमधील शाही घराण्यातील राजकुमार यांची प्रेमकथा प्रेक्षकांना लव्ह का है इंतजार या मालिकेत पाहायला मिळणार आहे. लव्ह का है इंतजार या मालिकेची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या मालिकेतील प्रेमकथा ही खूपच वेगळी आहे. या मालिकेत किथ सिक्वेरा आणि संजीदा शेख हे प्रमुख भूमिकेत आहेत. किथ या मालिकेत एका राजकुमाराची व्यक्तिरेखा साकारणार आहे तर संजीदा शेख या मालिकेत अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या मालिकेत बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री दाखवली असून तिला तिच्या प्रसिद्धीचा काहीही गर्व नाहीये. ते दोघे एकमेकांचे जीवनासाथी बनतात का हे पाहाणे रंजक ठरणार आहे. 
या मालिकेत किथ आणि संजीदाशिवाय सोनी राझदान, प्रीतीका राव, सारा आरफीन खान, खालीद सिद्दीकी, शिशिर शर्मा, योगेन्द्र टिक्कू आणि नताशा रस्तोगी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेची कथा ही नीना अरोराने लिहिली आहे. नीनाला पेज 3 या चित्रपटाच्या कथालेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. या मालिकेची कथा बॉलिवूडशी संबंधित असल्याने या मालिकेद्वारे हिंदी चित्रपटसृष्टी प्रेक्षकांना जवळून पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कारकीर्द केलेल्या सिद्धार्थ.पी. मल्होत्रा यांनी या मालिकेची निर्मिती केली असल्याने या मालिकेत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 
बॉलिवूडमध्ये यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली कामिनी माथूर मनाने एक सरळ-साधी मुलगी आहे. तिचे वडील एक आयएएस अधिकारी आहेत तर आई एक चित्रकार. यामुळे कामिनीला लहानपणापासून खूप चांगले संस्कार मिळालेले असतात. तिच्यातील साध्या मुलीवर प्रेम करणाऱ्या जीवनसाथीच्या ती शोधात असते. माधवसिंहाचा तिच्या जीवनात प्रवेश झाल्यावर तिचा हा शोध संपतो. तर महाराजा माधव हा स्वाभिमानी पण व्यवहारी राजा असतो. आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेले पण तरीही एकमेकांच्या क्षेत्रासाठी परके असलेल्या आणि वेगळ्याच स्वभावाच्या या दोन व्यक्ती हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतात. 

Web Title: Keith Sequeraa and Sanjida Shaikh have been waiting for Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.