केदार शिंदेची नवी मालिका क्या हाल मिस्टर पांचाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 14:52 IST2017-08-21T09:11:59+5:302017-08-21T14:52:56+5:30

क्या हाल मिस्टर पांचाल? या हिंदी मालिकेचे दिग्दर्शन केदार शिंदे करत आहेत. या मालिकेद्वारे ते हिंदी मालिकेकडे वळले आहेत.

Kedar Shindechi Navi Sarkar What is Mr. Panchal? | केदार शिंदेची नवी मालिका क्या हाल मिस्टर पांचाल?

केदार शिंदेची नवी मालिका क्या हाल मिस्टर पांचाल?

दार शिंदे यांनी अगं बाई अरेच्चा, श्रीमंत दामोदरपंत, यंदा कर्तव्य आहे, जत्रा यांसारखे अनेक चांगले चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांप्रमाणे मराठी मालिकांचे देखील दिग्दर्शन केले आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे, श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय यांसारख्या मालिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. मराठी रंगभूमीला देखील त्यांनी लोचा झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत, तू तू मी मी, सही रे सही यांसारखी दर्जेदार नाटकं दिली आहेत. मराठीतील एक प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी तो बात पक्की या हिंदी चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले होते आणि आता ते हिंदी मालिकांच्या दिग्दर्शनाकडे वळले आहेत. 
क्या हाल मिस्टर पांचाल? असे या मालिकेचे नाव असून ही मालिका स्टार भारत या वाहिनीवर झळकणार आहे. लाइफ ओके या वाहिनीचे नाव बदलून स्टार भारत असे ठेवण्यात आले आहे. क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेत एक आई आपल्या मुलाला सर्वगुणसंपन्न पत्नी मिळावी यासाठी देवाकडे नवस करते. पण एका मुलीत सगळेच गुण नसल्याने देवाच्या आशीर्वादामुळे तिच्या मुलाचे लग्न पाच मुलींशी होते आणि तिथून सुरू होते या मालिकेत खरी धमाल-मस्ती...
क्या हाल मिस्टर पांचाल? या मालिकेची निर्मिती विपुल डी शाह यांनी केली असून या मालिकेत कांचन गुप्ता आणि मनिंदर सिंग यांची मुख्य भूमिका आहे. एक सासू आणि पाच सुना असलेली ही मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवणार यात काहीच शंका नाही. 

 

Also Read : ​केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन

Web Title: Kedar Shindechi Navi Sarkar What is Mr. Panchal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.