‘केबीसी’चा पहिला प्रोमो आउट; महानायकांनी केली ‘ही’ घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:34 IST2017-06-10T11:48:36+5:302017-06-10T17:34:11+5:30

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमधून छोट्या पडद्यावर आगमन करीत आहेत. ...

KBC's first promo out; Declaration of 'this' announcements! | ‘केबीसी’चा पहिला प्रोमो आउट; महानायकांनी केली ‘ही’ घोषणा!

‘केबीसी’चा पहिला प्रोमो आउट; महानायकांनी केली ‘ही’ घोषणा!

लिवूडचे महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘केबीसी’ अर्थात ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय शोमधून छोट्या पडद्यावर आगमन करीत आहेत. ‘केबीसी’मधील महानायक अमिताभचा प्रश्न विचारण्याचा अंदाज खूपच लोकप्रिय असून, त्यांनी आतापर्यंतच्या सर्व एपिसोडमध्ये आपली छाप सोडली आहे. दरम्यान, केबीसीच्या ९व्या सिजनचा प्रोमो समोर आला असून, त्यामध्ये अमिताभचा अंदाज बघण्यासारखा आहे. 

प्रोमोमध्ये अमिताभ म्हणतात की, ‘होय, १७ जूनपासून रात्री ९ वाजता सुरू होणार आहेत माझे प्रश्न आणि केबीसी रजिस्ट्रेशन’. या प्रोमोमधून बिग-बी एकप्रकारे रजिस्ट्रेशनची तारीख जाहीर करीत आहेत. दरम्यान, बिग-बीने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरूनदेखील त्यांच्या चाहत्यांसाठी केबीसीचा प्रोमो शेअर केला आहे. ‘टी-२४५१ केबीसी इज बॅक.’}}}} ">T 2451 - KBC is back .. !!! BAADDUUUMMBAAAAA ! pic.twitter.com/LECpPweqyJ— Amitabh Bachchan (@SrBachchan) June 10, 2017अमिताभ यांनी त्यांच्या अकाउंटवर पोस्टर आणि व्हिडीओ शेअर करताच त्यांच्या फॅन्सनी हजारोंच्या संख्येने कॉमेंट्स दिल्या. शिवाय त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावदेखील करण्यात आला. यावेळी या शोचा फॉर्मेट सुरुवातीपेक्षा लहान ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरातील केवळ दोनशे स्पर्धकच या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या अगोदरच्या भागाचा विचार केल्यास त्यामध्ये स्पर्धकांची संख्या अधिक होती. मात्र यावेळेस निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. 

वास्तविक गेल्या वर्षीच डिसेंबर २०१६ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी हिंड दिली होती की, ते छोट्या पडद्यावर परतणार आहेत. त्यानुसार ते या शोमधून परतत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोची सुरुवात २००० मध्ये झाली होती. हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय अमिताभ यांची प्रश्न विचारण्याची खास शैलीही प्रेक्षकांना भावणारी आहे. या शोमुळे अमिताभ यांचे करियर सावरण्यास मदत झाली होती. 

Web Title: KBC's first promo out; Declaration of 'this' announcements!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.