'काव्या - एक जज्बा, एक जुनून' उत्कंठावर्धक वळणावर, काव्या आणि अधिराजमध्ये हळूहळू फुलतंय प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:32 PM2023-11-23T17:32:42+5:302023-11-23T17:33:08+5:30

Kavya - Ek Jazba, Ek Junoon Serial : 'काव्या - एक जज्बा, एक जुनून' मालिकेत नाट्यमय घडमोडींमुळे ट्विस्ट आला आहे. काव्या (सुंबुल तौकीर खान) आणि अधिराज (मिश्कत वर्मा) यांच्यातील ताटातुटीमुळे गैरसमज आणखी वाढत आहेत.

'Kavya - Ek Jazba, Ek Junoon' In an exciting twist, love slowly blossoms between Kavya and Adhiraj. | 'काव्या - एक जज्बा, एक जुनून' उत्कंठावर्धक वळणावर, काव्या आणि अधिराजमध्ये हळूहळू फुलतंय प्रेम

'काव्या - एक जज्बा, एक जुनून' उत्कंठावर्धक वळणावर, काव्या आणि अधिराजमध्ये हळूहळू फुलतंय प्रेम

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘काव्या - एक जज्बा, एक जुनून’ मालिकेत नाट्यमय घडमोडींमुळे ट्विस्ट आला आहे. काव्या (सुंबुल तौकीर खान) आणि अधिराज (मिश्कत वर्मा) यांच्यातील ताटातुटीमुळे गैरसमज आणखी वाढत आहेत. काव्याचा विभक्त प्रियकर शुभम (अनुज सुल्लेरे) याने संशयाची बीजे पेरली आहेत. राजीवला तुरुंगात डांबण्याच्या कटात अधिराजचा सहभाग होता, या शुभमच्या आरोपांमुळे टोक गाठले जाते. मात्र, काव्या आणि अधिराजसाठी नियतीच्या मनात काही वेगळेच चाललेले असते. दोघांतही प्रेमाचे वारे हळुवारपणे वाहायला सुरुवात झालेली आहे. 

दिवाळी पार्टीच्या दरम्यान, शुभम या दोघांची भेट न होऊ देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र, परिस्थितीच अशी काही निर्माण होते की, त्यातून काव्या आणि अधिराज हे डान्स फ्लोअरवर एकत्र येतात. ते एक रोमँटिक नृत्याचे सादरीकरण करतात. यातून त्यांच्यातील निर्विवाद प्रेमभावनांची सर्वांना खातरजमा होतो. 


मालिकेतील सध्याच्या कथानकाबाबत मिश्कत वर्मा म्हणाला की, “काव्या आणि अधिराज हे गैरसमजुतींच्या वादळांनी घेरलेले असतात तेव्हाही त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती खूप प्रेम आणि आदराची भावना वसत असते. मालिकेतील या भागाच्या चित्रीकरणादरम्यान खूप मजा आली. कारण मी आणि सुंबुल अशा आम्ही दाेघांना नृत्याची सारखीच प्रचंड आवड आहे. प्रेक्षकांनाही ती अशीच आवडेल, अशी माझी आशा आहे.” 
काव्याप्रती आपल्या भावनांची कबुली अधिराज देईल का?, हे मालिकेच्या आगामी भागात कळेल.

Web Title: 'Kavya - Ek Jazba, Ek Junoon' In an exciting twist, love slowly blossoms between Kavya and Adhiraj.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.