जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

By अमित इंगोले | Updated: November 23, 2020 08:58 IST2020-11-23T08:56:33+5:302020-11-23T08:58:41+5:30

KBC 12 : बस्तर येथे राहणाऱ्या अनुपा दास केबीसीमध्ये एक कोटी रूपये जिंकल्या आहे. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन हा विजय मिळवला आहे.

Kaun Banega Crorepati : Anupa Das win 1 cr rupees promo going viral | जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

जे बात! KBC ला मिळाली तिसरी करोडपती, जिंकलेल्या रकमेतून करणार आईच्या कॅन्सरवर उपचार

KBC चा १२ वा सीझन अनेकांना कोट्यधीश करून सोडणार असं चित्र आहे. जेव्हापासून शो सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत दोन महिला एक-एक कोटी रूपये जिंकल्या आहेत. आता जेव्हा कौन बनेगा करोडपती संपण्याच्या उंबरठ्यावर आलंय तेव्हा शो ला आणखी एक करोडपती मिळणार आहे.

बस्तर येथे राहणाऱ्या अनुपा दास केबीसीमध्ये एक कोटी रूपये जिंकल्या आहे. त्यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन हा विजय मिळवला आहे. अमिताभ बच्चन सुद्धा तिसऱ्यांदा ७ कोटी रूपयांचा जॅकपॉट प्रश्न विचारणार आहेत. आता अनूपा ७ कोटी रूपये जिंकणार की नाही हे प्रोमोतून समजून येत नाही. तसंही आतापर्यंत या सीझनमध्ये कुणीरी जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाही. अशात अनूपा यांच्याकडून लोक अपेक्षा लावून बसले आहेत. 

मेकर्सकडून जो प्रोमो शेअर करण्यात आला आहे त्यानुसार अनूपा या जिंकलेल्या रकमेतून आपल्या आईचं कॅन्सरचं ऑपरेशन करणार आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या आईना थर्ड स्टेजचा कॅन्सर आहे. अनूपा यांना आईवर उपचार करायचे आहेत. त्यांचं हेच एक स्वप्न आहे की, त्यांची आई बरी व्हावी. जेवढी रक्कम त्या जिंकल्या आहेत त्यातून आईवर उपचार तर नक्कीच होतील.

दरम्यान, ६ वर्षांआधीही नरूला ब्रदर्सने केबीसीमध्ये ७ कोटी रूपये जिंकून इतिहास रचला होता. त्यावेळी ते सुद्धा हेच म्हणाले होते की, त्यांना त्यांच्या आईच्या कॅन्सरवर उपचार करायचे आहेत.

KBC च्या या सीझनबाबत सांगायचं तर सर्वातआधी नाझिया नसीम यांनी एक कोटी रूपये जिंकले होते. स्वत:ला एक फेमिनिस्ट सांगणाऱ्या नाझिया यांनी फारच उत्तम खेळ खेळला होता.  त्यांनी सर्वच प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन अमितान बच्चन आणि प्रेक्षकांना अवाक् केलं होतं.

तसेच या सीझनची दुसरी करोडपती आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा गर्ग या होत्या. त्यांनीही आपल्या ज्ञानाच्या जोरावर हा विजय मिळवला होता. त्या सध्या सोशल मीडियावर ट्रेंडही करत आहेत. 
 

Web Title: Kaun Banega Crorepati : Anupa Das win 1 cr rupees promo going viral