KBC 15 : १० हजारांसाठी विचारला गेला दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दलचा 'तो' प्रश्न, तुम्ही देऊ शकता का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 01:42 PM2023-10-28T13:42:44+5:302023-10-28T13:43:23+5:30

'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुण्याच्या प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

kaun banega crorepati amitabh bachchan asked question of shrimant dagdusheth ganpati temple | KBC 15 : १० हजारांसाठी विचारला गेला दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दलचा 'तो' प्रश्न, तुम्ही देऊ शकता का उत्तर?

KBC 15 : १० हजारांसाठी विचारला गेला दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दलचा 'तो' प्रश्न, तुम्ही देऊ शकता का उत्तर?

टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय अशा 'कौन बनेगा करोडपती' शोचं नवीन पर्व काही दिवसांपूर्वीच सुरू झालं. या शोच्या इतर पर्वांप्रमाणेच 'कौन बनेगा करोडपती १५' देखील लोकप्रिय ठरत आहे. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये सामान्य माणसांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी मिळते. बिग बी अमिताभ बच्चन या शोचं सूत्रसंचालन करतात. या शोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, हा शो सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 

'कौन बनेगा करोडपती'मध्ये पुण्याच्या प्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेल्या एका कुटुंबाला बिग बींनी दगडूशेठ गणपतीबद्दल प्रश्न विचारला. कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या कुटुंबाला १० हजारांसाठी "पुण्याच्या प्रसिद्ध भगवान गणपती मंदिराचे नाव पूर्ण करा : श्रीमंत दगडूशेठ ___गणपती" असा प्रश्न विचारला होता. यासाठी A. हलवाई B. शिक्षक C. पुरोहित D. कलावंत असे चार पर्याय देण्यात आले होते. 

'कौन बनेगा करोडपती'मध्ये सहभागी झालेल्या कुटुंबीयांनी या प्रश्नाचं A. हलवाई असं बरोबर उत्तर देत १० हजार रुपये जिंकले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: kaun banega crorepati amitabh bachchan asked question of shrimant dagdusheth ganpati temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.