"आयुष्याचा एक तृतीयांश काळ..." KBC १७ च्या शेवटच्या भागात अमिताभ बच्चन झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:04 IST2026-01-04T10:03:28+5:302026-01-04T10:04:04+5:30
KBC १७ च्या शेवटच्या भागात प्रेक्षकाचा निरोप घेताना अमिताभ बच्चन हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

"आयुष्याचा एक तृतीयांश काळ..." KBC १७ च्या शेवटच्या भागात अमिताभ बच्चन झाले भावुक
Amitabh Bachchan Said Goodbye To Kbc 17 : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही काम करत आहेत. आताही रात्री एक वाजेपर्यंत ते लोकप्रिय 'केबीसी' शोचं शूट करतात. २ वाजता घरी जातात. या वयात त्यांचा दांडगा उत्साह वाखणण्याजोगा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिग बी 'केबीसी' होस्ट करत आहेत. याच शोमुळे कर्जात बुडालेले बिग बी मालामाल झाले होते. 'कौन बनेगा करोडपती'चा १७वा सीझन संपला आहे. शेवटच्या भागात प्रेक्षकाचा निरोप घेताना अमिताभ बच्चन हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
अमिताभ यांनी 'कौन बनेगा करोडपती १७'च्या मंचावर एक असं वक्तव्य केलं, ज्याची चांगलीच चर्चा आहे. शहेनशाह अभिनेत्याचं हे वक्तव्य ऐकून सर्वांच्या काळजात धस्स झालं. अमिताभ बच्चन म्हणाले, "कधीकधी आपण एखाद्या क्षणात इतके हरवून जातो की जेव्हा तो क्षण संपायला येतो, तेव्हा असं वाटतं की अरे, हे तर आताच सुरू झालं होतं. माझ्या आयुष्याचा एक तृतीयांश पेक्षा जास्त काळ मी तुमच्यासोबत या मंचावर घालवला आहे, यासाठी मी भाग्यवान स्वत:ला समजतो".
पुढे ते म्हणाले, "जेव्हा जेव्हा मी हसलो, तुम्ही माझ्यासोबत हसलात. जेव्हा माझ्या डोळ्यांत पाणी आलं, तेव्हा तुमच्याही डोळ्यांत अश्रू होते. तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझ्या या प्रवासाचे साक्षीदार आहात. तुम्ही आहात म्हणून हा गेम आहे आणि हा गेम आहे म्हणून आम्ही आहोत".