Kashmera Shah : तू तर रानू मंडलपेक्षाही...., कश्मीरा शाहचा ‘ नो मेकअप’ लुक पाहून नेटकऱ्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:02 PM2022-10-14T18:02:26+5:302022-10-14T18:04:25+5:30

Kashmera Shah : कश्मीरा शाहला एक व्हिडीओ शेअर करणं चांगलंच महागात पडलं. तिने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

kashmera shah brutally trolled for her no makeup look netizens | Kashmera Shah : तू तर रानू मंडलपेक्षाही...., कश्मीरा शाहचा ‘ नो मेकअप’ लुक पाहून नेटकऱ्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स

Kashmera Shah : तू तर रानू मंडलपेक्षाही...., कश्मीरा शाहचा ‘ नो मेकअप’ लुक पाहून नेटकऱ्यांच्या ‘नको त्या’ कमेंट्स

googlenewsNext

बॉलिवूड स्टार्ससाठी मेकअप किती गरजेचा आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. विना मेकअप लुक शेअर केल्यावर जबदस्त ट्रोल होणाऱ्या सेलिब्रिटींना हे चांगलंच ठाऊक आहे. सध्या कोण ट्रोल होतंय? तर कॉमेडियन कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) बायको व अभिनेत्री कश्मीरा शाह. होय, कश्मीरा शाहला (Kashmera Shah) एक व्हिडीओ शेअर करणं चांगलंच महागात पडलं. तिने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.

कश्मीरा बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. तिचा लूक चाहत्यांना अनेकदा घायाळ करत असतो. आता मात्र कश्मीराचा लुक पाहून नेटकऱ्यांनी नको त्या कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. कश्मीरानं एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. या व्हिडीओत कश्मीरा  तिच्या मेकअप रूटींगबद्दल बोलतेय. व्हिडीओच्या सुरूवातीला ती विना मेकअप दिसते. कश्मीराने मोठ्या दिमाखात मेकअप रूममधून इन्स्टा लाइव्ह केलं पण तिला हे  मेकअप लाईव्ह चांगलंच महागात पडलं. व्हिडीओतील कश्मीराचा नो मेकअप लुक पाहून युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ‘डरा दिया, इस रूप में तो कृष्णा भी डर जाए,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘तू विना मेकअप चंकी पांडे दिसतेय,’ असं एकाने लिहिलं.  ‘तू तर राणू मंडलपेक्षाही भयानक दिसू लागली आहेस,’ अशी कमेंट एका युजरने केली.

लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह रिअल लाईफमध्ये प्रचंड बोल्ड आणि बिनधास्त आहे. 90 च्या दशकात काश्मीराने अनेक सिनेमांत काम केले. येस बॉस, प्यार तो होना ही था, फिर हेराफेरी, कहीं प्यार ना हो जाए, दुल्हन हम ले जाएंगे, जंगल अशा अनेक सिनेमात कश्मीरा दिसली. अनेक चित्रपटांत तिने आयटम सॉन्गही केलेत.
 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कश्मीरा व कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले. 2013 मध्ये लास वेगासमध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं होतं. काही कॉमन फ्रेंड्समुळे त्या दोघांची ओळख झाली होती.  

Web Title: kashmera shah brutally trolled for her no makeup look netizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.