हंसल मेहतांच्या 'स्कूप'मध्ये जागृतीच्या भूमिकेतून करिश्मा तन्नाने जिंकली प्रेक्षकांची मनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 19:41 IST2023-06-09T19:33:46+5:302023-06-09T19:41:09+5:30

'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी करिश्मा आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Karishma Tanna won the hearts of the audience with the role of Jagriti in Hansal Mehta's 'Scoop'! | हंसल मेहतांच्या 'स्कूप'मध्ये जागृतीच्या भूमिकेतून करिश्मा तन्नाने जिंकली प्रेक्षकांची मनं!

हंसल मेहतांच्या 'स्कूप'मध्ये जागृतीच्या भूमिकेतून करिश्मा तन्नाने जिंकली प्रेक्षकांची मनं!

उत्तम अभिनय शैलीसह बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करिश्मा तन्ना (karishma tanna). बऱ्याचदा करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री यावेळी तिच्या कामामुळे चर्चेत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक क्राइम थ्रिलर वेब सीरिजचा सध्या ट्रेंड पाहायला मिळतोय. नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी माध्यमावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज 'स्कूप' मुळे करिश्मा चर्चाचा विषय ठरली आहे.  

'क्युँकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणारी करिश्मा आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करिश्माने आजवर अनेक मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही तितकाच दांडगा आहे.'स्कूप' मधील तिचा अभिनय पाहून चाहते तिचं कौतुक करतायेत. 

 सोशल मीडियावर या सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहेत. हंसल मेहता दिग्दर्शित या वेबसिरीजमध्ये करिश्माची मुख्य भूमिका आहे. करिश्मा तन्नासह यात हरमन बावेजा, मोहम्मद झीशान अय्युब, प्रोसेनजीत चॅटर्जी, देवेन भोजानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, करिश्माने मालिकांसह अनेक रिअॅलिटी शो, सिनेमांमध्ये काम केलं आहे संजू सिनेमामध्येही तिने छोटेखानी भूमिका साकारली होती.

Web Title: Karishma Tanna won the hearts of the audience with the role of Jagriti in Hansal Mehta's 'Scoop'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.