करिश्मा तन्ना रमली खेळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:20 IST2018-08-01T14:19:06+5:302018-08-01T14:20:26+5:30

मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा तन्नाने चित्रीकरण करीत असतानाही कामाबरोबरच विरंगुळाही शोधून काढला आहे. ती अलीकडेच फिल्मसिटीत या मालिकेचे चित्रीकरण करत होती. तेव्हा तिने फिल्मसिटीच्या आसपास राहणाऱ्या लहान मुलांबरोबर खेळ खेळून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले

Karishma Tanna Ramle in the sport | करिश्मा तन्ना रमली खेळात

करिश्मा तन्ना रमली खेळात

‘नागिन’ आणि ‘कयामत की रात’ या टीव्ही शोमुळे करिश्मा तन्ना सध्या चर्चेत आहे. सगळीकडे तिचीच चर्चा आहे. अगदी अलीकडे रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात करिश्माची भूमिका अगदीच छोटी होती. पण त्यातही तिने आपली छाप सोडली होती. सध्या ती कयामत की रात या मालिकेत झळकत आहे. वैशिष्ट्यपूर्ण कथानक आणि दिग्गज कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘कयामत की रात’ या मालिकेने प्रेक्षकांमधील उत्कंठा कायम ठेवली आहे. ही मालिका नुकतीच सुरू झाली असली तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री करिश्मा तन्नाने चित्रीकरण करीत असतानाही कामाबरोबरच विरंगुळाही शोधून काढला आहे. ती अलीकडेच फिल्मसिटीत या मालिकेचे चित्रीकरण करत होती. तेव्हा तिने फिल्मसिटीच्या आसपास राहणाऱ्या लहान मुलांबरोबर खेळ खेळून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. ती या मुलांबरोबर मनापासून खेळत होती आणि खेळताना ती त्यांच्यातीलच एक लहान मूल झाली होती. या लहान मुलांबरोबर पारंपरिक भारतीय लपंडावाचा खेळ खेळताना ती दिसली. ही सगळी मुले ‘कयामत की रात’ या मालिकेचे चित्रीकरण पाहायला आली होती.

करिश्माला चित्रीकरण करताना पाहून या मुलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि ही गोष्ट करिश्माने अचूक टिपली. तिचा प्रसंग संपल्यावर दुसऱ्या प्रसंगाची तयारी सुरू असताना करिश्माने स्वत:च पुढाकार घेऊन या मुलांबरोबर खेळ खेळायला सुरुवात केली. तिला या मुलांमध्ये एक मूल झालेले पाहून ‘कयामत की रात’चे सर्व कर्मचारी आणि अन्य कलाकारही आश्चर्याने तिच्याकडे बघत होते.

करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत. आता ‘कयामत की रात’मधली तिची राणीची भूमिका देखील प्रेक्षकांना तितकीच आवडेल अशी कयामत की रात या मालिकेच्या टीमला खात्री आहे.  

Web Title: Karishma Tanna Ramle in the sport