Good News: लग्नाच्या ११ वर्षांनतर इमली फेम अभिनेता झाला बाबा, पत्नीने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 11:55 IST2023-06-17T11:39:54+5:302023-06-17T11:55:29+5:30
करण हा टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Good News: लग्नाच्या ११ वर्षांनतर इमली फेम अभिनेता झाला बाबा, पत्नीने दिला दोन जुळ्या बाळांना जन्म
सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अलीकडेच
अभिनेत्री गौहर खान आई झाली आहे. तिच्या जीवनातील ही गुडन्यूज तिने चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर आता हिंदी इंडस्ट्रीतील एक अभिनेता बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. इमली फेम करण वोहराच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे.
१६ जून रोजी करण वोहराची पत्नी बेला वोहराने दोन मुलांना जन्म दिला आहे. त्याने एका इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्युट पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. या फोटोसोबत अभिनेत्याने लिहिले- " ओम नमः शिवाय."
करण इमली मालिकेत दिसला होता. या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. लग्नाच्या ११ वर्षानंतर करण आणि त्याची पत्नी बेला आई-बाबा झालेत. चाहत्यांनी अभिनेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या पत्नीने बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या करण पत्नीसोबत दिल्लीत आहे. लवकरच तो पत्नी आणि आपल्या चिमुकल्यांना मुंबईत आणणार असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितलं.