​करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षाही आवडतो हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 14:09 IST2017-12-26T08:39:08+5:302017-12-26T14:09:08+5:30

करण जोहरने दिग्दर्शक म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ...

Karan Johar likes to play movies | ​करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षाही आवडतो हा चित्रपट

​करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षाही आवडतो हा चित्रपट

ण जोहरने दिग्दर्शक म्हणून कुछ कुछ होता है या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर आजवर करणने कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर कल हो ना हो, दोस्ताना, ये जवानी है दिवानी, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, बद्रिनाथ की दुल्हनिया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. करण जोहरने आजवर अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन केले असल्यामुळे त्याच्या याच चित्रपटांमधील एखादा चित्रपट त्याचा आवडता चित्रपट असेल असे तुम्हाला वाटत असेल. पण हे खरे नाहीये. करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या अथवा त्याची निर्मिती असलेल्या चित्रपटांपेक्षा एका दुसऱ्याच दिग्दर्शकाचा चित्रपट प्रचंड आवडतो आणि करणनेच नुकतीच ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या आगामी रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात करण प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाचे सध्या चित्रीकरण सुरू आहे. याच चित्रीकरणाच्या दरम्यान त्याने हे गुपित सांगितले आहे. 
करण जोहरने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली. या चित्रपटात करणने एक छोटीशी भूमिका देखील साकारली होती. माझ्या चित्रपटांपेक्षा देखील दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट मला अधिक आवडतो असे करणने नुकतेच इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात सांगितले आहे. करण सांगतो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात मी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो, तेव्हा प्रेमात पडण्याच्या कल्पनेच्याच मी प्रेमात पडलो होतो. दिलवाले दुल्हनिया… मधील रोमान्स अगदी सरळ साधा आणि मनापासून व्यक्त झाला होता.
केवळ करणच नव्हे तर प्रियांका देखील दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाच्या प्रेमात आहे. हा चित्रपट तिला खूप आवडत असल्याचे तिने देखील या कार्यक्रमात सांगितले. प्रियांकाला गेस्ट परीक्षक म्हणून पहिल्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : करण जोहरला निर्माता बनायचे नव्हते तर या क्षेत्रात करायचे होते करियर

Web Title: Karan Johar likes to play movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.