n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे कपल सध्या मीडियात चांगलेच चर्चेत आहे. ते दोघे एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असल्याचे म्हटले जात आहे. लव्ह स्कूल हा रिअॅलिटी शो चांगलाच गाजला होता. या रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन लवकरच येणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना यांनी केले होते. पण नुकतेच त्यांचे ब्रेकअप झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमातून डिच्चू देण्यात आला आहे. आता या कार्यक्रमासाठी एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रेटी कपलचा विचार केला जात आहे. बिपाशा आणि करण यांची जोडी या कार्यक्रमासाठी योग्य असल्याचे निर्मात्यांना वाटत असल्याची चर्चा आहे.