​कपिलच्या शोमध्ये ‘सुल्तान’चे प्रमोशन नाही?? पण का??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 17:53 IST2016-06-23T12:23:04+5:302016-06-23T17:53:04+5:30

सलमान खान सध्या ‘सुल्तान’च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. मग प्रमोशन म्हटल्यावर टीव्ही शो आलेच. अलीकडे सलमानने ‘उडान’ या मालिकेसाठीच्या प्रमोशन ...

Kapil's show is not a promotion of 'Sultan'? But why ?? | ​कपिलच्या शोमध्ये ‘सुल्तान’चे प्रमोशन नाही?? पण का??

​कपिलच्या शोमध्ये ‘सुल्तान’चे प्रमोशन नाही?? पण का??

मान खान सध्या ‘सुल्तान’च्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. मग प्रमोशन म्हटल्यावर टीव्ही शो आलेच. अलीकडे सलमानने ‘उडान’ या मालिकेसाठीच्या प्रमोशन शोची शूटींगही केली. याशिवाय टीव्हीवरील अनेक शोमध्ये सलमान ‘सुल्तान’चे प्रमोशन करताना दिसणार आहे. मात्र एका बातमीनुसार,आत्तापर्यंत सलमानने कपिल शर्माच्या ‘दी कपिल शर्मा शो’मधील प्रमोशनसाठी होकार दिलेला नाही. आजपर्यंत सलमान प्रत्येकवेळी कपिलच्या शोमध्ये गेला आणि खळखळून हसला देखील. मात्र यावेळी ‘सुल्तान’च्या प्रमोशनसाठी सलमान कपिलच्या शोमध्ये जाणार नाही, अशी बातमी आहे. का??? सूत्रांचे मानाल तर यामागे ‘कलर्स’ वाहिनी असल्याचे बोलले जातेय. सलमान कलर्सवर लवकरच ‘बिग बॉस१०’ होस्ट करताना दिसणार आहे. आता कपिल व कलर्समध्ये बिनसल्याचे तर तुम्हाला ठाऊक आहेत..कदाचित याच कारणामुळे सलमान ‘सुल्तान’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये जाऊ इच्छित नाही.

Web Title: Kapil's show is not a promotion of 'Sultan'? But why ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.