Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 01:50 PM2023-01-11T13:50:08+5:302023-01-11T13:51:27+5:30

नुकताच कपिल शर्माचा नवीन भाग शूट करण्यात आला आहे आणि यामध्ये सहभागी झालेले पाहुणे हे खूपच खास आहेत.

kapil-sharna-invites-mumbai-dabewale-in-his-show-shared-post-on-instagram | Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक

Kapil Sharma मध्ये आले खास पाहुणे, 'मुंबईची शान...';म्हणत कपिलने शेअर केली पोस्ट; होतंय कौतुक

googlenewsNext

Kapil Sharma : टीव्हीवरील लोकप्रिय 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' शो ची नेहमीच चर्चा असते. कपिल शर्माचा हजरजबाबीपणा, त्याचे विनोदाचे पर्फेक्ट टायमिंग, सहकलाकारांचा अभिनय आणि प्रमोशनसाठी आलेले पाहुणे यांची धम्माल मस्ती यामुळे या 'शो'चे चाहते जगभरात आहेत. नुकताच कपिल शर्माचा नवीन भाग शूट करण्यात आला आहे आणि यामध्ये सहभागी झालेले पाहुणे हे खूपच खास आहेत. कपिल शर्माच्या या कृत्याचे सध्या कौतुकही होत आहे. 

कोण आहेत हे खास पाहुणे ?

कपिलने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नवीन भागाचे शूट पार पडले असून काही खास पाहुणे आल्याचं त्याने म्हणलं आहे. हे पाहुणे आहेत मुंबईचे डबेवाले. 'डबेवाले हे मुंबईची शान आहेत. एकवेळ ट्रेन यायला उशिर होईल, बस उशिराने येईल पण आपले डबेवाले बंधू नेहमीच वेळेत पोहोचतात. ते दररोज २ लाख डबे मुंबईभर पोहोचवतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते हे कार्य करत आहेत.त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम' असे कॅप्शन कपिलने दिले आहे. 



कपिलने शो मध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना सहभागी करुन घेतल्याने सध्या कपिलवर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक कलाकारांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे कौतुक केले आहे. 

जवळपास २५ डबेवाले बंधू कपिल शर्माच्या शो मध्ये सहभागी झाले आहेत. या भावांसोबत कपिलची मस्ती बघायला प्रेक्षक उत्सुक आहेतच. काही दिवसात हा एपिसोड ऑन एयर होईल.

Web Title: kapil-sharna-invites-mumbai-dabewale-in-his-show-shared-post-on-instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.