कपिल शर्माच्या शो मधले 'हे' दोन कलाकार भिडले आपसात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:16 IST2017-07-27T10:36:21+5:302017-07-27T16:16:07+5:30
कपिल शर्माच्या कॉमेडी शोचे सध्या वाईट दिवस चालले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरुन ...

कपिल शर्माच्या शो मधले 'हे' दोन कलाकार भिडले आपसात!
क िल शर्माच्या कॉमेडी शोचे सध्या वाईट दिवस चालले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरुन परतताना फ्लाईटमध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची भांडण झाली.यानंतर सुनील आणि अली अजगरने हा शो सोडला. त्यामुळे शो ची टीआरपी दिवसंदिवस खाली चालली होती. शो ची टीआरपी परत आणण्यासाठी कपिलने शोमध्ये चंदन प्रभाकरला आणले आणि त्यानंतर काही दिवसांनी भारती सिंगची ही शोमध्ये एंट्री झाली. मात्र तरी काही केल्या कपिल मागची शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही आहे.
![]()
ALSO READ : OMG! सुनील ग्रोव्हरने वाढवले त्याचे मानधन... एका एपिसोडसाठी घेतोय तब्बल इतके लाख
गेल्या 2 महिन्यांपासून अचानक कपिलची सेटवर तब्येत अनेकवेळा बिघडली आहे आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. यामुळे शाहरुख खान, अनुष्का शर्मा तसेच अनिल कपूर, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टी यासारख्या कलाकारांना कपिलच्या सेटवरुन शूटिंग न करताच परतावे लागले होते. कपिलच्या कुटुंबीयांकडून तो डिप्रेशनमध्ये गेल्या असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र कपिलच्या मागचे प्रोब्लेम इथेच संपत नाही तर आता असे कळतेय की या शो मधल्या दोन सहकलाकरांची आपसात भांडण झाली आहेत. भारती सिंग आणि किकू शारदा यांच्या शीतयुद्ध सुरु असल्याचे कळतेय. याआधी ही कॉमेडी सर्कसमध्ये भारती आणि किकू एकत्र परफॉर्म करायचे मात्र दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर किकूने हा शो सोडला होता. किकू कपिल शर्माच्या जवळच्या व्यक्तिंपैकी एक आहे. भारतीचे या शोमध्ये येणं किकूला फारसे रुचले नसल्याचे कळते. मात्र किकू आणि भारतीने या सगळ्या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.