कपिल शर्माची आॅनस्क्रिन पत्नी सिमरन कौर मुंडी दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 14:34 IST2017-08-30T08:59:08+5:302017-08-30T14:34:18+5:30

सुपरस्टार सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस’ सीजन-११ या रिअ‍ॅलिटी शोची आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार असून, त्यासाठी चार स्पर्धकांची ...

Kapil Sharma will be seen in 'Bigg Boss' house, Simran Kaur Mundi's Anasreen wife! | कपिल शर्माची आॅनस्क्रिन पत्नी सिमरन कौर मुंडी दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात!

कपिल शर्माची आॅनस्क्रिन पत्नी सिमरन कौर मुंडी दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात!

परस्टार सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस’ सीजन-११ या रिअ‍ॅलिटी शोची आॅक्टोबर महिन्यात सुरुवात होणार असून, त्यासाठी चार स्पर्धकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे कॉमेडियन कपिल शर्माची आॅनस्क्रिन पत्नी सिमरन कौर मुंडी हे असल्याचे समजते. अभिनेत्री तथा मॉडेल असलेल्या सिमरनने कपिल शर्माचा डेब्यू चित्रपट ‘किस किस को प्यार करू’मध्ये त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सिमरनने तेलगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

सिमरन २००८ मध्ये तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिने ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही नशीब आजमावले. यावेळी तिला अंतिम पाच स्पर्धकांमध्ये स्थान मिळाले होते. तसेच सिमरन २०११ मध्ये शाहरूख खानचा रिअ‍ॅलिटी गेम शो ‘जोर का झटका’मध्येही बघावयास मिळाली होती. तिने या शोचा सातवा एपिसोड जिंकला होता. शोच्या अंतिम १५ स्पर्धकांमध्ये तिला स्थान मिळाले होते. 



त्याचबरोबर सिमरनने २०१३ मध्ये हॉकी इंडिया लीगलादेखील होस्ट केले आहे. सिमरनने २०११ मध्ये आलेल्या ‘जो हम चाहें’मधून बॉलिवूड डेब्यू केला आहे. असो, सिमरन व्यतिरिक्त बिग बॉससाठी ज्या तीन अन्य स्पर्धकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यामध्ये टीव्ही अभिनेता सीजेन खान, भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जी आणि अभिनेता मनोज तिवारी हे आहेत. या शोसाठी एवलिन शर्मा यांनाही निर्माते अ‍ॅप्रोच झाले होते. परंतु त्यांनी यास नकार दिला. 



‘बिग बॉस’ छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त टीव्ही शो आहे. हा शो नोव्हेंबरनंतर सुरू केला जात असतो. परंतु यावेळेस आॅक्टोबरमध्येच शोची सुरुवात केली जात आहे. शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये अभिनेता वरुण धवन बघावयास मिळणार आहे. यास शोच्या निर्मात्यांनीच दुजोरा दिला आहे. 

Web Title: Kapil Sharma will be seen in 'Bigg Boss' house, Simran Kaur Mundi's Anasreen wife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.