Kapil Sharma Wedding : पाहा, कपिल व गिन्नीच्या लग्नाचे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:55 AM2018-12-13T09:55:13+5:302018-12-13T09:56:34+5:30

कपिल शर्माने गत रात्री गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. कपिल व गिन्नीच्या लग्नाकडे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचे लक्ष होते. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचले होते. अखेर लग्न थाटामाटात पार पडले.

Kapil Sharma Wedding: kapil sharma ginni chatrath wedding first pic of bride and groom | Kapil Sharma Wedding : पाहा, कपिल व गिन्नीच्या लग्नाचे फोटो!!

Kapil Sharma Wedding : पाहा, कपिल व गिन्नीच्या लग्नाचे फोटो!!

googlenewsNext
ठळक मुद्देहोय, नवरदेव बनलेला कपिल आणि नवरी बनलेली गिन्नी यांचा पहिला फोटो दृष्ट लागावा इतका सुंदर आहे. या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.

कपिल शर्माने गत रात्री गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. कपिल व गिन्नीच्या लग्नाकडे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचे लक्ष होते. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचले होते. अखेर लग्न थाटामाटात पार पडले. या लग्नानंतर प्रतीक्षा होती ती कपिल व गिन्नीच्या लग्नाच्या फोटोची. तर पहिला फोटो समोर आला आहे. होय, नवरदेव बनलेला कपिल आणि नवरी बनलेली गिन्नी यांचा पहिला फोटो दृष्ट लागावा इतका सुंदर आहे. या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.


कपिल शर्मा लग्नमंडपात पोहोचला आणि त्याचे फोटो क्लिक करण्यासाठी गर्दी झाली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 या लग्नाचे खूप सारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. 


लग्नानंतर १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.  

गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता.

याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.

 गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार आहे.  
  
 

Web Title: Kapil Sharma Wedding: kapil sharma ginni chatrath wedding first pic of bride and groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.