The Kapil Sharma Showमधल्या चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:51 PM2021-12-13T12:51:09+5:302021-12-13T12:57:48+5:30

द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधील प्रत्येक कलाकारांना स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो.

The kapil sharma show chandan prabhakar aka chandu net worth the actor takes lakhs for one episode | The Kapil Sharma Showमधल्या चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो लाखो रुपये

The Kapil Sharma Showमधल्या चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो लाखो रुपये

googlenewsNext

द कपिल शर्मा शो'  (The Kapil Sharma Show)  मधील प्रत्येक कलाकारांना स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉमेडी शोमध्ये चंदू चायवाला(Chandu Chaiwala) ची भूमिका साकारणारा चंदन प्रभाकर  (Chandan Prabhakar) त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. चंदू म्हणजेच चंदन प्रभाकर बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे.'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज 3'चा चंदन फर्स्ट रनर अप होता. तिथून चंदनच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.


चंदनचा इथंवर पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. यासाठी त्याने बराच संघर्ष केला. परंतु, अनेक संकटांवर मात करत चंदन प्रभाकरने कलाविश्वात स्वत:चं हक्काचं एक स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे शून्यातून विश्व उभं करणारा चंदन आज कोट्यवधींच्या संपत्तीचा  मालक आहे.

चंदू चायवालाकडे म्हणजेच चंदनाकडे जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती  आहे.चंदनला गाड्यांची विशेष आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे. यात BMW 3 Series 320D यांसारख्या गाड्यांचाही समावेश आहे. चंदन एका एपिसोडसाठी ५ते ७ लाख रुपये मानधन घेतो असं म्हटलं जातं.

चित्रपटांमध्येही झळकलाय चंदन
 छोट्या पडद्याप्रमाणेच चंदन काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. यात 'भावनाओं को समझो', 'पावर कट', 'डिस्को सिंग' आणि 'जज सिंह एलएलबी' या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

Web Title: The kapil sharma show chandan prabhakar aka chandu net worth the actor takes lakhs for one episode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.