​टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, जाणून घ्या कपिलचा स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 13:19 IST2018-04-02T07:49:07+5:302018-04-02T13:19:07+5:30

कपिल शर्माने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात ...

Kapil Sharma, know Kapil's strapless to work on a telephone booth | ​टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, जाणून घ्या कपिलचा स्ट्रगल

​टेलिफोन बुथवर काम करायचा कपिल शर्मा, जाणून घ्या कपिलचा स्ट्रगल

िल शर्माने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो कॉमेडी सर्कस या कार्यक्रमात झळकला. या कार्यक्रमातील सगळ्याच सिझनचे विजेतेपद त्याला मिळाले. या कार्यक्रमामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे कपिलने या कार्यक्रमानंतर काहीच महिन्यात स्वतःचा कॉमेडी नाईट विथ कपिल हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हा कार्यक्रम प्रेक्षकांना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळत होता. पण या कार्यक्रमावरून कलर्स वाहिनीसोबत कपिलचा वाद झाल्यामुळे हा कार्यक्रम अचानक बंद करण्यात आला. या कार्यक्रमाच्या टीमला घेऊन काहीच दिवसांत कपिलने सोनी या वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरू केला. या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. पण कार्यक्रमाला काहीच महिने झाले असता कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांचा वाद झाला. या कार्यक्रमाची टीम एका कामानिमित्त सिडनीला गेली असता विमानात दारू पिऊन कपिलने सुनीलसोबत भांडणं केली. या कारणामुळे सुनीलने द कपिल शर्मा शोला रामराम ठोकला. त्यानंतर अली असगर देखील या कार्यक्रमातून बाहेर पडला. त्यामुळे या कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस ढासळत गेला. त्यामुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला. आता यानंतर फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा हा कपिलचा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तितकीशी प्रसिद्धी मिळत नाहीये. 
कपिलचा आज ३७ वा वाढदिवस असून तो एका सामान्य कुटुंबातून आलेला आहे. तो मुळचा पंजाब येथील अमृतसर मधील असून त्याचे बालपण अमृतसरमधील पोलीस कॉलनीमध्ये गेले आहे. त्याचे वडील हे हेड कॉन्स्टेबल होते तर आई गृहिणी. कपिलने प्रचंड स्ट्रगल करून आज यश मिळवले आहे. शाळेत असताना कपिल एका टेलिफोन बुथवर काम करत असे. एवढेच नव्हे तर कॉल्ड्रिंगचे क्रेट्स उचलायचे देखील काम त्याने केले आहे. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना कपिलने अनेक छोटी-मोठी कामं केलेली आहेत. कॉलेजमध्ये असतानाच कपिल अभिनयक्षेत्राकडे वळला. कपिलने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. 

Also Read : ​तर 'या' कारणामुळे कपिलने राणी मुखर्जीच्या शोचे शूट केले कॅन्सल

Web Title: Kapil Sharma, know Kapil's strapless to work on a telephone booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.